Salman Khan | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पुन्हा दिलासा, पुढच्या सुनावणीस हजर राहण्याचा आदेश!

Salman Khan | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पुन्हा दिलासा, पुढच्या सुनावणीस हजर राहण्याचा आदेश!

सलमान खान आज (1 डिसेंबर) न्यायालयासमोर हजर व्हायचे होते. जिल्हा व सत्र जिल्हा न्यायाधीश राघवेंद्र कछवाल यांच्या न्यायालयात होणारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Harshada Bhirvandekar

|

Dec 01, 2020 | 3:55 PM

मुंबई : काळवीट शिकार (Blackbuck Killing) आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सलमान खान आज (1 डिसेंबर) न्यायालयासमोर हजर व्हायचे होते. जिल्हा व सत्र जिल्हा न्यायाधीश राघवेंद्र कछवाल यांच्या न्यायालयात होणारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तर, 16 जानेवारी रोजी पुन्हा न्यायलयात यावर सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीस सलमानला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वकील हस्तीमल सारस्वत यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली होती (Salman Khan Blackbuck Killing Case update).

वकील हस्तीमल यांनी सलमानची बाजू मांडताना म्हटले की, ‘सलमान खान मुंबईत राहतात. मुंबईसह जोधपुरमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या परिस्थितीत सलमानने मुंबईहून जोधपुरला येणे धोकादायक आहे. यामुळेच तो आज कोर्टात हजर राहू शकला नाही. त्यामुळे यावेळेस त्याला क्षमा करण्यात यावी’. वकिलांच्या या युक्तिवादानंतर सलमान खानला पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

राजस्थानला 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या चित्रपटातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे या खटल्यात हे सर्वजण आरोपी आहेत.

जवळपास दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात 5 एप्रिल 2018 रोजी जोधपूर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सलमानला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता (Salman Khan Blackbuck Killing Case update).

इतरांची निर्दोष मुक्तता

तर, त्याच वेळी उर्वरित आरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली, तब्बू आणि दुष्यंत सिंह यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. यानंतर सलमानने खालच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. 7 एप्रिल रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सलमानला त्याच्याविरूद्ध खटल्याच्या शिक्षेची शिक्षा कायम ठेवत सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर सलमानच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता.

या सर्व प्रकरणांत जिल्हा व सत्र न्यायाधीश जोधपूर जिल्ह्यात हे अपील प्रलंबित आहे. शिक्षेनंतर सुमारे अडीच वर्षांच्या या कालावधीत सलमानने काहीना काही कारणाने हजार राहणे टाळले आहे. याकाळात त्याने तब्बल 15 वेळा ‘हजेरी माफी’चा लाभ घेतला आहे. यावेळीही सलमानच्या वकिलांनीच त्याची बाजू मंडळी आहे.

(Salman Khan Blackbuck Killing Case update)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें