
Salman Khan Bulletproof car: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान याला एकदा नाही तर, अनेकदा जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने स्वीकारली. नुकताच, मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागात एक धमकीचा संदेश आला आहे. यावेळी सलमान खानच्या घरात घुसून त्याला ठार मारण्याच्या आणि त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
सांगायचं झालं तर, सतत येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खान याने बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे. दुबईतून आलेल्या या कारचं नाव Nisaan Patrol आहे.
सलमान खानने त्याच्या सुरक्षेसाठी या कारवर किती पैसे खर्च केले ते आज जाणून घेवू… ही कोणत्या कंपनीची गाडी आहे जी परदेशातून आयात केली आहे? ही गाडी भारतात उपलब्ध नाही का? या कारमध्ये गोळ्या आणि बॉम्बपासून संरक्षण करण्यासाठी काही विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत का आणि या कारची किंमत किती आहे? आज सलमान खान याच्या गाडीबद्दल सर्वकाही जाणून घेवू… शिवाय स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खान याने किती पैसे खर्च केले याबद्दल देखील जाणून घेवू.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये फक्त एक नाही तर अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कार गोळ्यांचा वर्षाव सहन करण्यास सक्षम आहे, याशिवाय, या कारमध्ये बॉम्ब अलर्ट इंडिकेटर सारख्या वैशिष्ट्यांसह येते. कारमधील प्रवाशांच्या गोपनीयतेसाठी, या कारला टिंटेड विंडोज देण्यात आल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने या बुलेटप्रूफ कारसाठी 2 कोटी रुपये खर्च केले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही, म्हणूनच सलमान खान याने ही कार दुबईहून आयात केली आहे.