AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचपन का प्यार अब बूढ़ा हो रहा है…, सलमान खानचा व्हिडीओ पाहून असं का म्हणाले चाहते?

Salman Khan | बचपन का प्यार अब बूढ़ा हो रहा है..., सलमान खान याला असं का म्हणाले चाहते? व्हिडीओ व्हायरल, सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव...

बचपन का प्यार अब बूढ़ा हो रहा है..., सलमान खानचा व्हिडीओ पाहून असं का म्हणाले चाहते?
| Updated on: Mar 29, 2024 | 1:13 PM
Share

‘पटना शुक्ला’ OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 29 मार्चपासून प्रदर्शित होत आहे. अरबाज खान निर्मित सिनेमाचं स्क्रिनिंग गुरुवारी आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये भाईजान चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. सलमान खानचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्याच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बचपन का प्यार अब बूढ़ा हो रहा है…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आपला आवडता अभिनेता आता वृद्ध होतोय…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडची जान सलमान खान…’, चौथा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तो का वृद्ध होईल, सलमान जगातील हँडसम अभिनेता आहे…’ सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याबद्दल अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

स्क्रिनिंग दरम्यान सलमान खान याला सतीश कौशिक यांच्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा भाईजान म्हणाला, ‘सतीश कौशिक माझ्या प्रचंड क्लोज होते. त्यांच्याबद्दल सर्वांत मोठी गोष्ट सांगायची झाली तर, त्यांनी निधनापूर्वी सर्व सिनेमांची शुटिंग पूर्ण केली. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात देखील सतीश होते…’ असं म्हणत सलमान खान भावूक झाला.

सलमान खान आणि सतीश कौशिक यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाशिवाय दोघांनी ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ ‘भारत’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता ‘पटना शुक्ला’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमुळे चर्चेत आला आहे. सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते आजही अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान