सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला कसली वाटतेय भीती, तिला का हवीये बंदूक? जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण..., अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
फाईल फोटो
| Updated on: Oct 14, 2025 | 8:24 AM

Salman Khan : अभिनेता सलमान खान याने प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्रींना डेट केलं आहे. आज देखील सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंड कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी चर्चेत आली आहे. आता संगीता हिला स्वतःच्याच घरात सुरक्षित वाटत नाही. यामागे कारण देखील तसंच आहे. चार महिन्यांपूर्वी संगीता बिजलानी हिच्या फार्महाऊसमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आहे. पण याप्रकरणी कोणतीच माहिती समोर न आल्यामुळे अभिनेत्री चिंतीत आहे. संगीता हिने सांगितलं की, या घटनेनंतर अभिनेत्रीला स्वतःच्या घरात सुरक्षित वाटत नाही. काही महिन्यांपूर्वी संगीताने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेऊन तपासाची स्थिती जाणून घेतली.

जुलैमध्ये काही अज्ञात लोकांनी संगीताच्या फार्महाऊसमध्ये घुसून तोडफोड केली. त्यांनी रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि फर्निचरचे नुकसान केलं आणि भिंतींवर अश्लील शब्द लिहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर 50 हजार रुपयांची रोकड आणि 7 हजार रुपयांचा टीव्ही देखील लंपास केली.
घटनेबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी गेल्या 20 वर्षांपासून याठिकाणी राहत आहे. पवना माझ्यासाठी घरासारखं होतं. पण या भयानक चोरीला साडेतीन महिने झाले आहेत आणि अजूनही कोणतेही सुगावे लागलेले नाहीत. चोरी आणि तोडफोड करण्यात आली. नशीब तेव्हा मी तेथे नव्हती… घरातील भींतींवर अश्लील गोष्टी लिहिलेल्या होत्या… सुरक्षा खूप महत्त्वाची आहे… घटनांमुळे, पवना येथील रहिवासी घाबरले आहेत… ”

 

 

अभिनेत्रीला हवीय बंदूक…

संगीता बिजलानी म्हणाली, ‘या घटनेनंतर मी पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. एक महिला म्हणून, जर मी एकटी घरी गेली तर मला काही सुरक्षा मिळायला हवी असं मला वाटतं. मला यापूर्वी कधीही शस्त्र परवान्याची गरज भासली नव्हती, पण आता मला असुरक्षित आणि थोडी भीती वाटते.’ असं देखील अभिनेत्री संगीता बिजलानी म्हणाली.

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचं नातं

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या लग्नात्या पत्रिका देखील छापण्यात आलेल्या. पण काही कारणामुळे लग्न होऊ शकलं नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याच्यासोबत लग्न केलं.