VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या काही चाहत्यांनी सिकंदर चित्रपट पाहताना थिएटरमध्ये थेट फटाके फोडल्याची घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच  फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल
Salman Khan Fans Set Off Fireworks in Theater,
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 7:23 PM

ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच गर्दी केली आहे. पण चाहत्यांच्या काही गोष्टी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

चाहत्यांच्या कृतीमुळे थिएटरमध्ये लोकांचे जीव धोक्यात 

सलमान खानचं फॅनफॉलोइंग किती आहे सर्वांना माहितच आहे. पण कधीकधी चाहते असे काही करतात ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. सलमानच्या चाहत्यांनी असच काहीस केल्याचं समोर आलं आहे. ‘सिकंदर’ चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही चाहत्यांनी असे काही केले ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. चाहत्यांच्या एका कृतीमुळे सिनेमागृहात उपस्थित असलेल्या लोकांचे जीव चक्क धोक्यात आले. याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकही तेवढे संतापले आहेत.

थिएटरमध्ये थेट फटाके फोडले 

‘सिकंदर’ चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही चाहत्यांनी दरम्यान, चाहत्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये, सिकंदर पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्येच चित्रपट पाहत असतानाच थेट फटाके फोडले आहे. ‘ए मेरी जोहरा जबीं’ या गाणे सुरु होताच चाहत्यांनी उत्साहात फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे

चाहत्यांनी उत्साहात फटाके फोडण्यास सुरुवात करताच सिनेमा हॉलमध्ये गोंधळ उडाला आणि अनेकांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थिएटरमध्ये गोंधळ निर्माण झाला. तेव्हा अजूनही काही दुर्घटना होण्याची शक्यता होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक ते मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका थिएटरचा असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ 31 मार्चचा आहे. या घटनेनंतर थिएटर व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करण्याबाबत बोललं जात आहे. तसेच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे की, “हे काय आहे, हे चुकीचे आहे. तर “दुसऱ्याने लिहिले आहे की “या जगात असे चाहते देखील आहेत.”

चित्रपटाला फारसी पसंती मिळताना दिसत नाहीये

सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ईदच्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली. तिसऱ्या दिवशी, सिकंदर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. चित्रपटाने फक्त 19 लाख रुपये कमावले. सलमान खानचे करोडो चाहते असले तरी मात्र चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसे प्रेम मिळताना नाहीये.