
मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण आता सलमान खान याचा एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. व्हिडिओमध्ये सलमानची प्रकृती पाहून चाहते त्याच्या तब्येतीची चिंता करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका बर्थडे पार्टीचा असल्याचं समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
एका नेटकऱ्याने अभिनेत्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सलमान एका श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते थक्क झाले. सलमान याची प्रकृती खालावलेली दिसत आहे. शिवाय भाईजान थकलेला देखील दिसत आहे. तो स्वतःकडे दुर्लक्ष करून डान्स करताना दिसत आहे.
Lastest video of Salman khan dancing in a wedding function in New Delhi last night.
He looks so tired and unhealthy. He should take care of his health. pic.twitter.com/Tf2HycDweQ— Syed Irfan Ahmad (@Iam_SyedIrfan) October 1, 2023
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सलमानला काही आरोग्य समस्या आहेत. काही महिन्यांपासून त्याने जिमला जाणे बंद केलं असल्याची दावा एका सोशल मीडियावर युजरने केला आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सलमान खान याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. १० नोव्हेंबर रोजी ‘टायगर ३’ सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अभिनेता इमरान हश्मी देखील सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता ‘टायगर ३’ सिनेमा शिवाय अन्य सिनेमांच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक विष्णू वर्धन यांच्या सिनेमात देखील अभिनेता दिसणार आहे. एवढंच नाही तर सलमान खान अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘टायगर वर्सेस पठाण’ सिनेमात देखील दिसणार आहे.