
बिग बॉस मराठी सीजन 6 ची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉसचे पाचवे सीजन हीट ठरले. त्यानंतर आता नव्या सीजनची जोरदार चर्चा आहे. त्यामध्येच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठी घोषणा केली. सलमान खान याने थेट बिग बॉस मराठी सीजन 6 ला होस्ट नेमके कोण करणार हेच सांगून टाकले. बिग बॉस हिंदी सीजन 19 चा फिनाले 7 डिसेंबरला आहे. त्यानंतर मराठी बिग बॉस सीजन 6 ला सुरूवात होईल. महेश मांजरेकर की रितेश देशमुख कोण बिग बॉस मराठीला होस्ट करणार यावरून जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता अखेर सलमान खान याने यावरून पडदा काढला. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीला अभिनेता रितेश देशमुख याने होस्ट केले. विशेष म्हणजे रितेश देशमुखची खास शैली आणि तो अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
यंदाही बिग बॉसच्या नवा सीजनला रितेश देशमुख यानेच होस्ट करावे, अशी मागणी केली जात होती. शेवटी चाहत्यांची मागणी पूर्ण झाली असून रितेश देशमुख हाच बिग बॉस मराठी सीजन 6 ला होस्ट करताना दिसेल. तशी घोषणाही सलमान खान याने केली आहे. चाहत्यांकडून आता मराठी बिग बॉसची वाट बघितली जात आहे. बिग बॉस मराठीच्या घरात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार यावरून चर्चा रंगताना दिसत आहे.
गेल्या वर्षी बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर यासारखे अनेक प्रसिद्ध नावे दाखल झाली होती. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धेक ठरली. बिग बॉस सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाण हा झाला होता. रितेश देशमुख अनेकदा सूरजला काही गोष्टी समजून सांगताना दिसला. सूरज एक फाटकी चप्पल आणि दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचला होता.
घरातील जवळपास सर्वच स्पर्धेकांनी त्याला सपोर्ट केला. फक्त हेच नाही तर अनेकांनी त्याला स्वत:ची कपडे देखील दिसली. बिग बॉस मराठीच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत बिग बॉस सीजन 5 राहिले. पहिल्यांदाच रितेश देशमुख हा बिग बॉसला होस्ट करताना दिसला. मात्र, त्याने अशाप्रकारे सीजन होस्ट केले की, प्रेक्षकांच्या मनावर खास छाप सोडण्यात त्याला मोठे यश मिळाले.