
Abhinav Kashyap On Salman Khan: 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग’ सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक अभिनव कश्यप याच्यावर होती. या सिनेमानंतर अभिनव याने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. आता पुन्हा अभिनव, सलमान खान याला गुंड म्हणाला आहे… ज्यामुळे सर्वत्र सलमान खान आणि अभिनव कश्यप यांच्या वादाची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनव म्हणाला, ‘सलमान खान याला अभिनयात जराही रस नाही आणि गेल्या 25 वर्षांपासून को फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी काम करतो. तो एक गुंड आहे. ‘दबंग’ सिनेमाच्या आधी मला काहीही माहिती नव्हतं. सलमान खान असभ्य आणि घाणेरडा व्यक्ती आहे. तो बॉलिवूडमधील स्टार सिस्टमचा जनक आहे..’
एवढंच नाही अभिनव म्हणाला, ‘सलमान खान अशा कुटुंबातून जे गेल्या 50 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ते द्वेष ठेवणारी लोकं आहे… ते संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. जर तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल तर ते तुमच्या मागे येतात.” यावेळी अभिनवने त्याचा भाऊ अनुराग आणि सलमानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटाचाही उल्लेख केला. ‘
अभिनव म्हणाला, ‘असंच काही अनुराग कश्यप याच्यासोबत ‘तेरे नाम’ सिनेमाच्या वेळी घडलं होतं. त्याने मला तेव्हा सांगितलं होतं, तू सलमान खान याच्यासोबत सिनेमा तयार करु शकत नाही…. सिनेमा का तयार होऊ शकत नाही, याबद्दल त्याने मला सविस्तर सांगितलं नाही. त्याला माहिती होतं मला त्रास दिला जाईल…’
अभिनव म्हणाला, ‘अनुराग या लोकांना फार चांगलं ओळखत होता. सिनेमा सिनेमा सोडला. ‘तेरे नाम’ सिनेमाची स्क्रिप्ट त्याने लिहिली होती. बोनी कपूर यांनी त्याच्यासोबत वाईट वर्तन केलं. त्या लोकांनी अनुराग याला क्रेडिट देखील दिलं नाही… तसंच माझ्यासोबत देखील झालं. ‘
‘दबंग’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अभिनवने खान कुटुंबावर त्याचं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. अभिनव म्हणाला की, ‘दबंग 2’ सिनेमाचं दिग्दर्शन करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यासोबत असं घडलं.