
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चाहते आवर्जून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. यात रितेशच छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातं. पण आता या चित्रपटातील अजून एक पात्र, अजून एक भूमिका चर्चेत आली आहे आणि आता या भूमिकेबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.
चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये सलमान खानची महत्त्वाची भूमिका
कारण रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.हा सुपरस्टार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात विश्वासू आणि शूर योद्ध्यांपैकी एक असलेल्या जीवा महालाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. वृत्तानुसार, सलमान 7 नोव्हेंबर रोजी त्याचा सीन शूट करणार आहे आणि हा चित्रपटातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
सलमानची ही भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक
सलमान खान जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा तो एक अनोखी जादू निर्माण करतो. आता, तो रितेश देशमुखच्या आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये त्याच्या शक्तिशाली भूमिकेद्वारे तोच करिष्मा दाखविण्यास सज्ज झाला आहे. तसेच त्याची मराठमोळी वेशभूषा, त्याचे पात्र पाहण्यासाठी चाहचे खरंच उत्सुक आहेत.
चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत दिसणार?
दरम्यान सलमान खानने याआधीही रितेशच्या मराठी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात आधीच एक छोटीशी भूमिका साकारली आहे. तसेच वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय…’ या गाण्यातही दिसला होता. आता तो ‘राजा शिवाजी’ चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. अफजल खानचा योद्धा सय्यद बंदाचा सामना करताना जीवा महालाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले होते. या चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सलमानच्या पहिल्या लूकची सर्वांनाच प्रतिक्षा
सलमान खानला मराठी भाषा ही उत्तम प्रकारे बोलता येते आणि समजते देखील.त्यामुळे त्याला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचंही त्याने मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा रितेशचे मराठी चित्रपट येतात त्यात सलमानची छोटीशी तरी झलक असतेच असते. त्यामुळे सलमानचा पहिला लूक कधी समोर येतोय याची चाहते नक्कीच वाट पाहत आहेत.
सलमान खानच्या कामाबद्दल
सलमान खानकडे एक जबरदस्त चित्रपट लाइनअप आहे, ज्यामध्ये “बॅटल ऑफ गलवान” चा समावेश आहे. त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यापासून ऑनलाइन बरीच चर्चा आणि प्रेक्षकांची उत्सुकता निर्माण केली आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे.