AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: ‘या’ महिलेला सलमान खान मानतो संपूर्ण विश्व, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला…

Salman Khan Social media Post: 'ही' महिला आहे सलमान खान याचं संपूर्ण विश्व, खास व्हिडीओ पोस्ट करत भाईजान म्हणाला..., सोशल मीडियावर सलमान खानचा व्हिडीओ चर्चेत

Salman Khan: 'या' महिलेला सलमान खान मानतो संपूर्ण विश्व, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...
| Updated on: Dec 10, 2024 | 10:46 AM
Share

Salman Khan Social media Post: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. भाईजान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. जगभरात सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या भार मोठी आहे. पण अभिनेत्यासाठी संपूर्ण जग त्याचं कुटुंब आहे. सलमान खान याच्या आई सलमा खान यांचा वाढदिवस आहे.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सलमान खान याने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान याने भाऊ सोहैल खान आणि आई सलमा खान यांचा डान्स करताना एक व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत भाईजानने कॅप्शनमध्ये, ‘मम्मी हॅप्पी बर्थडे… मदर इंडिया, आमचं जग…’ असं लिहिलं आहे. सलमान खान याच्या पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रीटी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

बॉलीवूडमधील दिग्गज लेखकांची जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या डॉक्युमेंट-सीरीज अँग्री यंग मॅनमध्ये, अरबाज खानने सांगितलं होतं की, सलमा खान यांनी कधीच मुलांना दुसरी आई हेलन यांच्याबद्दल काहीही चुकीचं सांगितलं नाही.

अरबाज खान म्हणाला होता, ‘आमच्या आईने कधीच आमच्या वडिलांविरोधात आम्हाला काही सांगितलं नाही. आईच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. पण त्यांनी कधीच आम्हाला असा विचार करु दिला नाही की, तुमचे वडील कसे आहेत… ते असं काही करतात… असं कधीच झालं नाही…’

पुढे अरबाज म्हणाला, ‘अर्पिता खान आणि अलवीरा खान अग्निहोत्री यांच्यापासून कुटुंबातील प्रत्येक लहान सदस्य हेलन यांना आंटी म्हणून हाक मारतो… जेव्हा हेलन आमच्या आयुष्यात आल्या तेव्हापासून आम्ही त्यांना आंटी म्हणून हाक मारतो… हेलन यांना देखील आम्ही आमच्या आईप्रमाणे मानतो… त्या देखील आता आमच्या आयुष्याचा एक भाग आहेत… आमची आई देखील हेलन यांच्या प्रत्येक आवडी-निवडीची काळजी घेत असते…’ असं देखील अरबाज खान शोमध्ये म्हणाला होता.

Follow Us
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या