
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या आयुष्यात नुकतीच एक दु:खद घटना घडली. तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. तसेच नागा चैतन्य अन् शोभिता यांच्या लग्नाच्या कारणावरूनही ती चर्चेत होती. पण आता समांथाने नागा चैतन्यवर केलेले एक वक्तव्य व्हायरल होत आहे. जे की ते वक्तव्य तिच्या पूर्वाश्रमीचा नवरा नागा चैतन्यविषयी बोलताना दिसत आहे.
सध्या समांथाची वेब सीरिज ‘सिटाडेल: हनी बनी’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. याच सीरिजच्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी मुलाखत देण्यासाठी पोहोचली होती.
एक्स पतीवर पैसा उधळल्याचा धक्कादायक खुलासा
त्यावेळी एका खेळादरम्यान वरुणनं तिला एक प्रश्न विचारला की ‘तू सगळ्यात जास्त पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च केले. जे पूर्णपणे वाया गेले असं तुला वाटतं?’ त्यावर क्षणभरही न थांबता समांथानं उत्तर दिलं ‘माझ्या पूर्वाश्रमीच्या जोडीदारावर मी भरपूर पैसा उधळला. त्याला मी अनेक महागड्या गिफ्ट म्हणून दिलेल्या.’
समांथानं दिलेलं हे उत्तर ऐकूण वरुणला आश्चर्य वाटलं आणि त्यावर त्याने विचारलं की ‘किती पैसे?’ यावर समांथाने थोडावेळ घेत मिश्किलपणे म्हणाली ‘खूप जास्त.’ समांथाने स्पष्ट आणि थेटच नागा चैतन्यबाबत असं वक्तव्य केल्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटलं. समांथाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
घटस्फोटाचं नक्की अद्यापही अस्पष्ट
नागा चैतन्य आणि समांथानं बरीचवर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2017 मध्ये लग्न केलं होतं. पण दोघांनी लग्नाच्या 4 वर्षानंतर विभक्त झाले आणि 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं नक्की कारण काय याविषयी अद्यापही कळलं नाही. मात्र वरुण धवनसोबत व्हिडीओमध्ये समांथाच्या नागा चैतन्यला लग्नाच्या वेळी दिलेल्या महागड्या गिफ्ट्सच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.