
साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे कायमच चर्चेत असते. नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर तर समंथाबाबत जास्तच चर्चा होताना दिसू लागली होती. त्यानंतर जेव्हा नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं तेव्हाही त्या जोडीबद्दल कमी पण समांथाबद्दल नेटवर जास्त सर्च केलं गेलं.
समंथा खरंच पुन्हा एकदा प्रेमात
आता देखील समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या अफेअरच्या चर्चांमुळे. होय, ती दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याचं म्हटलं जातं आहे. दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत परंतु दोघांनीही डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगले आहे.
समांथा अनेकदा सोशल मीडियावर राज निदिमोरूसोबतचे फोटो शेअर करते. एका वृत्तानुसार दोघांमधील नाते अधिक जवळ आले आहे. आणि ते या वर्षाच्या अखेरीस त्यांचे नाते अधिकृत करू शकतात.असंही म्हटलं जात आहे.
दोघांचेही नाते कन्फर्म, समांथाने शेअर केलेला दुबई ट्रीपचा VIDEO
दरम्यान आता नाता त्या दोघांचेही नाते कन्फर्म होण्याचं अजून एक कारण म्हणजे समांथाने शेअर केलेले दुबई ट्रीपचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ. समांथाने तिच्या दुबई ट्रिपचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘मी जे पाहिलेले अन् त्या विरुद्ध तू जे पाहिले ते’. समंथाने ट्रिपमधील विविध आनंदी क्षण शेअर केले. व्हिडिओमध्ये, समंथाला पहिल्यांदा एवढं दिलखुलास हसताना पाहिल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
समांथा एका पुरूषाचा हात धरून उभी
यानंतर, या व्हिडीओमध्येच समांथा एका पुरूषाचा हात धरून उभी आहे आणि तिचं प्रेम दर्शवताना दिसत आहे. मात्र, तिने त्या पुरूषाचा चेहरा दाखवला नाही. पण हा व्हिडीओ आणि हा क्षण पाहून चाहत्यांचा असा विश्वास आहे की सामंथाच्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तिचा कथित बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरूच आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये राज निदिमोरूचे नावही लिहित आहेत. सामंथाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या डेटिंगच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. चाहते अभिनेत्रीसाठी आनंदी आहेत.
राज निदिमोरू घटस्फोटीत आहे
राज निदिमोरू विवाहित असल्याचं म्हटलं जातं. तर काही वृत्तांनुसार ते त्याची पत्नी श्यामली डे पासून वेगळेही झाले असल्याचं सांगितलं जातं. राजने 2015 मध्ये श्यामली डेशी लग्न केले होते.मात्र दोघेही 2022 मध्ये वेगळे झाले. परंतु दोघांनीही घटस्फोटाबद्दल कधीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र चाहत्यांचा असा विश्वास आहे की समांथा आणि राज यांच्यातील नाते ते लवकरच सर्वांसमोर आणतील. चाहते समांथासाठी नक्कीच आनंदी असल्याचं त्यांच्या कमेंट्समधून दिसत आहे. त्यामुळे आता हे दोघेही कधी आपले नाते सर्वांसमोर मान्य करतायत याची सर्वजन वाट पाहतायत.