Samantha | ‘समंथाचं करिअर संपुष्टात’, निर्मात्याच्या टीकेवर अभिनेत्रीने दिलं असं उत्तर, जे वाचून तुम्हीही हसाल!

| Updated on: Apr 24, 2023 | 8:27 AM

चिट्टीबाबू यांनी समंथाच्या आजारपणावरूनही कमेंट केली होती. “समंथाचं वजन कमी झालंय आणि तिचा चेहरासुद्धा बदलला आहे. ती आता आजारी आहे आणि चित्रपट चालण्यासाठी ड्रामा करतेय. प्रत्यक्षात तिचं करिअर संपुष्टात आलं आहे," असं ते म्हणाले होते.

Samantha | समंथाचं करिअर संपुष्टात, निर्मात्याच्या टीकेवर अभिनेत्रीने दिलं असं उत्तर, जे वाचून तुम्हीही हसाल!
Samantha
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आजारपणातून बरं होत असताना समंथाने या चित्रपटाचं प्रमोशन केलं. मात्र त्याचवेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते चिट्टीबाबू यांनी तिच्या करिअरवरबाबत मोठं वक्तव्य केलं. समंथाचं स्टारडम पहिल्यासारखं राहिलेलं नाही, तिचं फिल्मी करिअर संपुष्टात आलंय. असं ते म्हणाले होते. आता समंथाने त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. समंथाने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

काय म्हणाले होते चिट्टीबाबू?

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी समंथाबाबत धक्कादायक दावा केला होता. समंथाचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं आहे, आता तिला पुन्हा पहिल्यासारखं स्टारडम मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. चिट्टी बाबू यांनी हा दावा समंथाने ज्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन केलं, त्यावरून केला आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी ती आजारपणाचा आधार घेतेय, असंही त्यांनी म्हटलं होतं.

समंथाचं सडेतोड उत्तर

समंथाने चिट्टीबाबू यांच्या या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे पण चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चिट्टीबाबू यांच्या कानांवर केस आहेत. समंथाने गुगलवर सर्च केलं की कानावरील केस का वाढतात आणि त्याचा स्क्रीनशॉट तिने नाव न घेता सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे समंथाचा इशारा कोणाकडे होता, हे सर्वांना चांगलंच समजलंय.

हे सुद्धा वाचा

समंथाच्या आजारपणावरूनही केली होती कमेंट

चिट्टीबाबू यांनी समंथाच्या आजारपणावरूनही कमेंट केली होती. “समंथाचं वजन कमी झालंय आणि तिचा चेहरासुद्धा बदलला आहे. ती आता आजारी आहे आणि चित्रपट चालण्यासाठी ड्रामा करतेय. प्रत्यक्षात तिचं करिअर संपुष्टात आलं आहे. सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ते सर्व पब्लिसिटीसाठी होते. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आजारपणात काम केलंय. मात्र त्याचा उपयोग त्यांनी प्रसिद्धीसाठी केला नाही. समंथाने तिचं नाव आणि स्टारडम गमावलंय. ती एक सुपरस्टार होती आणि करिअरमध्ये तिने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र आता केवळ प्रसिद्धीसाठी ती तिच्या आजारपणाचा वापर करतेय. लोक भावनांनी प्रभावित होऊन चित्रपट पहायला जात नाहीत”, असं ते म्हणाले होते.