Samantha | ‘समंथाचं करिअर संपुष्टात, ड्रामा करतेय’; अभिनेत्रीवर भडकले प्रसिद्ध निर्माते, केला धक्कादायक दावा

"समंथाने तिचं नाव आणि स्टारडम गमावलंय. ती एक सुपरस्टार होती आणि करिअरमध्ये तिने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र आता केवळ प्रसिद्धीसाठी ती तिच्या आजारपणाचा वापर करतेय. लोक भावनांनी प्रभावित होऊन चित्रपट पहायला जात नाहीत."

Samantha | 'समंथाचं करिअर संपुष्टात, ड्रामा करतेय'; अभिनेत्रीवर भडकले प्रसिद्ध निर्माते, केला धक्कादायक दावा
Samantha Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:00 AM

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. घटस्फोटानंतर समंथा मायोसिटिस या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त झाली. या आजारामुळे ती शारीरिक आणि मानसिकरित्या खूप खचली. मात्र त्यातून बरी होत ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अशातच एका प्रसिद्ध निर्मात्याने समंथाचं फिल्मी करिअर संपल्याचा दावा केला आहे. तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. मात्र एकंदरीत आता समंथाचा स्टारडम पहिल्यासारखा राहिलेला नाही, असं त्या निर्मात्याने म्हटलंय.

समंथाचं करिअर संपुष्टात?

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी समंथाच्या बाबत धक्कादायक दावा केला आहे. समंथाचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं आहे, आता तिला पुन्हा पहिल्यासारखं स्टारडम मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. चिट्टी बाबू यांनी हा दावा समंथाने ज्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन केलं, त्यावरून केला आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी ती आजारपणाचा आधार घेतेय, असंही त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

“मेहनत करणं हा तुमच्या नोकरीचा भाग”

“हे सर्व खोटं आहे. शकुंतला साकारण्यासाठी खूप काही सहन केल्याचं समंथाने सांगितलं. पण प्रत्येक कलाकाराला हे सहन करावंच लागतं. त्यांनी भूमिका आत्मसात करण्यासाठी मेहनत करावीच लागते. यशोदाच्या प्रमोशनदरम्यानसुद्धा हेच घडलं. हा फक्त तिचा सहानुभूती मिळवण्याचा एक मार्ग आहे. पण हे योग्य नाही. मेहनत करणं हा तुमच्या नोकरीचा एक भाग आहे. आम्ही असं बऱ्याच कलाकारांना पाहिलंय, जे भूमिकेसाठी कोणतीही हद्द पार करू शकतात. मात्र समंथाने आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. ही फार स्वस्त पब्लिसिटी आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“समंथा आता सर्व पब्लिसिटीसाठी करतेय”

समंथाच्या करिअरविषयी ते पुढे म्हणाले, “समंथाचं वजन कमी झालंय आणि तिचा चेहरासुद्धा बदलला आहे. ती आता आजारी आहे आणि चित्रपट चालण्यासाठी ड्रामा करतेय. प्रत्यक्षात तिचं करिअर संपुष्टात आलं आहे. सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ते सर्व पब्लिसिटीसाठी होते. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आजारपणात काम केलंय. मात्र त्याचा उपयोग त्यांनी प्रसिद्धीसाठी केला नाही. समंथाने तिचं नाव आणि स्टारडम गमावलंय. ती एक सुपरस्टार होती आणि करिअरमध्ये तिने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र आता केवळ प्रसिद्धीसाठी ती तिच्या आजारपणाचा वापर करतेय. लोक भावनांनी प्रभावित होऊन चित्रपट पहायला जात नाहीत.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.