Samantha Ruth Prabhu Marriage: नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर 4 वर्षांनी समांथा अडकली लग्न बंधनात

Samantha Ruth Prabhu Marriage: नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर ४ वर्षांनी सामंथा रुथ प्रभुने आज दुसरे लग्न केल्याचे म्हटले जात आहे. समांथाने द फॅमिली मॅनच्या दिग्दर्शकासोबत लग्न केले आहे.

Samantha Ruth Prabhu Marriage: नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर 4 वर्षांनी समांथा अडकली लग्न बंधनात
Samantha marrigae
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 01, 2025 | 1:06 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु आणि राज निदिमोरू यांच्या नात्याच्या बातम्या बराच काळ चर्चेत होत्या. अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान राज निदिमोरूची पूर्व पत्नी श्यामली डे सतत सोशल मीडियावर विचित्र पोस्ट शेअर करत होती. ज्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा आणखी वाढली. आता सामंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी खाजगी पद्धतीने लग्ने केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.

अभिनेत्री सामंथा रूथ प्रभुने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिने दुसऱ्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार सामंथाने ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी अतिशय खासगी पद्धतीने विवाह केला आहे. या लग्नाला जवळच्या काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. मात्र, दोघांनीही अद्याप आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

लाल साडीत नवरी बनली सामंथा रूथ प्रभु

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंथा आणि राज यांनी आज, सोमवारी सकाळी लग्न केलं.  लग्न कोईम्बतूर येथील ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात पार पडलं. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. सामंथाने लग्नासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजच्या एक्स-पत्नीने केली होती पोस्ट

सांगायचं तर रविवारी रात्रीपासूनच त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होत्या. राज आणि सामंथा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. राजच्या माजी पत्नी श्यामली डे यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती, ज्यात लिहिलं होतं – “डेस्परेट लोक डेस्परेट कामं करतात.” या पोस्टनंतर सामंथा आणि राजच्या लग्नाच्या बातम्यांनी आणखी जोर धरला. 2022 मध्ये राज आणि श्यामली यांनी घटस्फोट घेतला होता. दुसरीकडे सामंथा रूथ प्रभुचं पहिलं लग्न नागा चैतन्यसोबत झालं होतं. ते लग्न फार काळ टिकलं नव्हतं. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे आले. नागा चैतन्यनेही दुसरं लग्न केलं आहे. त्याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं, आणि ते लग्न भव्य समारंभात पार पडलं.