AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःची कबर खणायला…, बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण करणारी पोस्ट

एक काळ जिने बॉलिवूड गाजवला, तिच माजी अभिनेत्री आज स्वतःची कबर खणण्याची गोष्ट करत आहे. बॉलिवूडची माजी अभिनेत्री सना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत सना हिने मुलं, नातेवाईक, भाऊ - बहीण यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

स्वतःची कबर खणायला..., बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण करणारी पोस्ट
सना खान
| Updated on: Jun 30, 2026 | 10:09 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या… पण सना खान अशी एक अभिनेत्री आहे जिने करियरच्या उच्चच्या शिखरावर असताना बॉलिवूडला रामराम ठोकला आणि मौलाना अनस सय्यद याच्यासोबत लग्न केलं. सध्या सना हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सर्वांना स्वतःच्या मृत्यू करा.. असं सांगितलं आहे. शेवटच्या क्षणी कोणीही तुमच्या मदतीसाठी धावून येणार नाही. एवढंच नाहीतर, तुमच्यासाठी कुराण पठण कोणी करणार नाही… तुमच्या कर्मांसाठी तुम्हाला माफ करणार नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली. पण सना असं का म्हणाली, अशा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सना म्हणते, ‘तुम्हाला खरंच असं वाटतं का, की तुमच्या मृत्यूनंतर तुमची मुलं, नातेवाईक तुमच्यासाठी कुराण पठण करतील आणि तुमच्या कर्मांसाठी तुम्हाला माफ करतील? ही मुलं जी नमाज देखील पठण करत नाहीत, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील आहे. हे नातेवाईत, तुमच्यासाठी प्रार्थना करतील का? भाऊ – बहीण जे तुमची ईदच्या दिवशी तुमची आठवण देखील काढत नाहीत, ते तुमच्यासाठी दान धर्म करतील का?’

पुढे सना म्हणते, ‘निष्पाप लोकांनो, प्रामाणिकपणाचं युग संपलंय आणि प्रयल जवळ येत आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. त्यामुळे तुमची कबर खणायला घ्या… इथे लोक जिवंत लोकांनाच विसरतात, तर मृत्यूनंतर काय लक्षात ठेवणार? सगळेच विसरतात… त्यामुळे तुमच्या स्वतःच्या कबरीची, तुमच्या स्वतःच्या मृत्यूनंतरच्या आयुष्याची आजासूनच सुरुवात करा..’, सना हिच्या अशा व्हिडीओनंतर चाहते देखील गोंधळात सापडले आहेत…

सना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2020 मध्ये बॉलिवूडला निरोप दिला आणि मुफ्ती अनस सय्यद याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सना हिने तिचा संपूर्ण वेळ फक्त कुटुंबाला देण्याचा निर्यण घेतला. सना आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. लग्नानंतर सना हिने दोन मुलांना जन्म दिला. पण सना हिने मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे.

Follow Us
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!