प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या इमारतीला आग… 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि…

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या इमारतीला आग लागली आहे... ज्यामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवशांमध्ये भीतीचं वातावरण आहे... अंधेरी येथील एका पॉश इमारतीत ही घटना घडली असून मोठी प्रकरणाबद्दल मोठी माहिती देखील समोर येत आहे...

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या इमारतीला आग... 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि...
फाईल फोटो
| Updated on: Dec 26, 2025 | 1:35 PM

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गुरुवार, 25 डिसेंबर रोजी भीषण आग लागली, ज्यात 12, 13 आणि 14 व्या मजल्यांना आग लागली. या इमारतीत प्रसिद्ध दिग्दर्शकाचं देखील घर आहे. दिग्दर्शक संदीप सिंह देखील अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या 14 व्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घराला देखील आग लागली आहे. पण ते सुरक्षित असल्याची देखील माहिती मिळत आहे. इमारतील आग लागल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांनी त्यांना त्यांच्या घरी आणलं…

मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी सकाळी अंधेरी पश्चिमेतील 23 मजली निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. यामुळे प्रचंड धूर झाला आणि तो वरच्या मजल्यांवर पसरला. यामुळे अनेक रहिवाशी इमारतीत अडकले… पण पायऱ्यांच्या मदतीने तब्ब्ल 40 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यास यश आलं.

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्कालीन पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई केली. शिवाय अडकलेल्या सर्वा रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं आहे. कोणाला देखील दुखापत झालेली नाही…

सुरक्षित आहेत दिग्दर्शक संदीप सिंह

या घटनेत संदीप सिंह सुरक्षित असल्याची बातमी कळल्यानंतर कुटुंबिय आणि मित्र परिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप सिंग यांची चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ते भन्साळी प्रॉडक्शनकडे आपला मोर्चा वळवला…

संदीप सिंह अनेक प्रसिद्ध सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत… त्यांनी ‘मैरी कॉम’, ‘सरबजीत’, ‘अलीगड’, ‘झुंड’, ‘स्वतंत्र्य वीर सावरकर’, ‘सफेद’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्नियामुळे त्यांची शस्त्रक्रिया झाली होती.. त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळाला होता… पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे… प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबिय देखील चिंतेत होते… पण आता त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासोबत देखील दिग्दर्शकाचा फोटो व्हायरल होत आहे.