तुरुंगात कपडे काढायला लावले, दिवसातून 100 वेळा तर…, 4 महिन्यांचा तुरुंगवास, प्रसिद्ध अभिनेत्री वाईट अवस्था
4 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री झालेली वाईट अवस्था, म्हणते, 'तुरुंगात पोहोताच कपडे काढायला लावले... दिवसातून 100 वेळा तर...', अभिनेत्रीकडून मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रीटी आहेत, ज्यांनी तुरुंगवास भोगला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी कठीण दिवसांबद्दल देखील मोठा खुलासा केला. आता देखील अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने मनी लॉन्ड्रींग प्रकरणी जवळपास 4 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. या चार महिन्यात तिला अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागला. तिने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संदीपा विर्क आहे. तुरुंगातील दिवस आठवणत अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगातील ते दिवस माझ्यासाठी रात्री पडलेलं वाईट स्वप्न होतं..’
मुलाखतीत संदीपा म्हणालेली, तुरुंगात माणसाची प्रचंड वाईट अवस्था होती. तिहार तुरुंगात कैद्यांची तपासणी करण्याचं काम आहे. तुरुंगातील अधिकारी संपूर्ण कपडे काढायला लावतात. तुरुंगात जाताच, तुमच्या चारित्र्यावर चिखलफेक करतात. तुमचे सर्व कपडे काढायला लावतात, प्रायव्हेट पार्टवर टॉर्च मारतात…
‘त्यांनी लाज वाटत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये देखील कपडे काढायला लावतात. बॉडीमध्ये कसं कोणी काय लपवू शकतं… जर तुमची चेकिंग इतकी कठोर आहे, तर तुरुंगात ड्रग्स आणि मोबाईल कसे करतात. तुरुंगात तुमच्याकडे पैसे आहेत, तर तुम्ही सर्वकाही करु शकता… तिकडे फक्त पैसा बोलतो..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे संदीपा म्हणते, ‘वेगवेगळ्या महिला तुम्हाला चेक करतात. 100 वेळा कपडे काढावे लागतात, ज्यामुळे मला मानसिक त्रास होत होता… कैद्यांचे तोंड आणि केस देखील मोकळे करायला लावतात.’, एवढंच नाही तर, तुरुंगातील स्वच्छतेबद्दल देखील अभिनेत्रने मोठं वक्तव्य केलं.
संदीपा म्हणते, ‘तुरुंगातील जेवण आणि टॉयलेट फार खराब असतं. पहिल्याच दिवशी मला 25 – 26 लोकांमध्ये ढकललं. त्या रात्री मला झोप आलीच नाही. तुरुंगात माझी अन्य कैदी महिलांसोबत मारहाण देखील झाली आहे. तुरुंगात प्रचंड टॉर्चर केलं जातं…’, असं देखील संदीपा विर्क म्हणाली आहे.
संदीपा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.