AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची स्पेशल नाईट डेट कोणासोबत? खुद्द फोटो पोस्ट करत म्हणाली…

Sania Mirza Posts Instagram Story : घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री, सानिया कोणासोबत निघाली स्पेशल नाईट डेटसाठी? फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची स्पेशल नाईट डेट कोणासोबत? खुद्द फोटो पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Feb 22, 2024 | 12:47 PM
Share

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया चर्चेत आली. सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सानिया आणि शोएब लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर शोएब याने नव्या जोडीदाराची निवड केली. पण सानिया हिच्या आयुष्यात देखील कोण्या खास व्यक्तीची एन्ट्री झाली का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

सानिया मिर्झा पूर्वीपासून सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नुकताच, सानिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. सांगायचं झालं तर, घटस्फोट झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील चाहते देखील सानिया हिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की शोएब मलिकप्रमाणे सानिया मिर्झानेही स्वत:साठी नवीन जीवनसाथी निवडला आहे का? याची चर्चा रंगली आहे. सानिया सध्या कोणासोबत वेळ व्यतीत करत आहे… यावर कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण नुकताच, सानिया हिने नाईट डिनर डेटचा आनंद घेताना दिसली.

खुद्द सानिया हिने नाईट डिनर डेटचे फोटो पोस्ट केले आहेत. पण डिनर डेटसाठी सानिया कोणत्या हॉटेलमध्ये नाही तर, स्वतःच्या खोलीत होती. सानिया हिने टेनिसपटू बेथानी माटेक-सँड्स हिच्यासोबत नाईट डिनरचा आनंद लुटला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे.

सानिया – शोएब यांचा घटस्फोट

सानिया मिर्झाचा आता घटस्फोट झाला आहे. सानिया मिर्झाने शोएबला खुला दिला आहे. त्यानंतर शोएब मलिकने तिसरा विवाह केला आहे. सना जावेद सोबत विवाह केल्यानंतर शोएबवर पाकिस्तानातूनच टीका केली जात आहे. सोशल मीडियावर देखील फक्त आणि फक्त सानिया आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सानिया आणि शोएब यांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सानिया देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.