Sanjay Dutt : जेलर महिलेने संजूबाबाला फक्त एकदाच खडसावलं अन्…, म्हणाल्या, ‘त्याला मराठी शिकता आली नाही, पण…’

Sanjay Dutt : संजू, तू बातों की जबान समझेगा या लातों की...? जेलर महिलेच्या सक्त स्वभावापुढे झुकलेल संजूबाबा, अभिनेत्याने कसा भोगला तुरुंगवास? जेलर म्हणाल्या, 'त्याला मराठी तर नाही शिकता आली नाही, पण...'

Sanjay Dutt : जेलर महिलेने संजूबाबाला फक्त एकदाच खडसावलं अन्..., म्हणाल्या, त्याला मराठी शिकता आली नाही, पण...
अभिनेता संजय दत्त
| Updated on: Sep 08, 2026 | 9:11 AM

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेता कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात संजूबाबाच्या एका वक्तव्याने सर्वांना चकित केलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत पोहोचले होते, तेव्हा प्रताप सपनाईक यांनी अभिनेत्याला मराठी बोलण्यास सांगितलं. पण संजूबाबाने मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. अभिनेता म्हणाला, ‘मी पाच वर्ष तुरुंगात राहिलो आणि मराठी शिकू शकलो नाही… ‘, आता, अभिनेत्याच्या कारागृह विभागाच्या माजी प्रमुखांनी त्यांच्या कारागृहातील दिवसांची आठवण सांगितली.

तुरुंगात नाही शिकू शकला मराठी…

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या माजी उपमहानिरीक्षक (DIG) स्वाती साठे यांनी आठवण सांगितली की, तुरुंगात असताना दत्तला मराठी भाषा तर शिकता आली नाही, पण त्याने नक्कीच एक दुसरी भाषा आत्मसात केली—ती म्हणजे धमकावण्याची भाषा. ‘आर्म्स एक्ट अंतर्गत दोषी सिद्ध झाल्यानंतर संजय दत्त याला मोठा धक्का बसलेला आणि तुरुंगातील आयुष्य त्याला स्वीकारताच येत नव्हतं.. कोर्टाने आदेश दिल्यानंतर जेव्हा त्याला पहिल्यांदा तुरुंगात आणलं, तेव्हा त्याने तुरुंगातील युनिफॉर्म घालण्यास स्पष्ट नकार दिला. जेल वॉर्डनने अभिनेत्याला कैद्यांसाठी असलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट घालण्यासाठी विनंती केली. पण त्याने नखरे केला आणि वॉर्डनसोबत असभ्य वर्तन केलं…’

जेल स्टाफने याबद्दल स्वाती साठे यांना सांगितलं. त्या कडक शिस्त आणि कामाबाबत अत्यंत कठोर व स्पष्ट दृष्टिकोन बाळगणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. तुरुंगाचे नियम मोडणाऱ्या धोकादायक गुंडांना सक्त चोप देण्याबाबत त्यांची ख्याती होती; अगदी सराईत गुन्हेगारही त्यांच्या दरारा असलेल्या व्यक्तिमत्त्वाला घाबरत असत.

दत्तच्या बेशिस्त वर्तनाबद्दलची माहिती मिळताच त्या संतापल्या आणि थेट त्याच्या बराकीत गेल्या. त्याच्या दिशेने आपला दंडुका रोखून त्यांनी बजावले, “संजू, तुला शब्दांची भाषा समजते की लाथांची?”, साठे यांच्या सक्त स्वभावाला संजूबाबा देखील घाबरला आणि तुरुंगातील नियम पाळणं आपल्यासाठी योग्य आहे… हे त्याला कळलं.’

‘त्यानंतर संजूबाबा चेंजिंग रुममध्ये गेला आणि युनिफॉर्म घातला…त त्यानंतर संजूबाबाने कधीच नखरे केले नाहीत. काही दिवसांनंतर तुरुंगातील वातावरणात तो रमला… सर्वांसोबत चांगलं बोलू लागला. अधिकाऱ्यांना अनेक कामांमध्ये त्याने मदत करण्यास सुरुवात केली. ‘लगे रहो मुन्ना भाई’ या सिनेमापासून प्रेरणा घेऊन तुरुंगातील रेडिओ सेवाही सुरू केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us