AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: गुडन्यूज! पेट्रोल-डिझेल मिळणार अर्ध्या किंमतीत? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण घातली ती अजब अट

Petrol Diesel Price: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणच्या युद्धादरम्यान कच्चे तेल स्वस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प सातत्याने होर्मुज स्ट्रेट समुद्रधुनी ताब्यात घेतल्याचा दावा करत आहेत. त्यात त्यांच्या घोषणेमुळे जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Petrol-Diesel Price: गुडन्यूज! पेट्रोल-डिझेल मिळणार अर्ध्या किंमतीत? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण घातली ती अजब अट
पेट्रोल-डिझेल मिळणार अर्ध्या किंमतीत?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 08, 2026 | 9:52 AM
Share

Petrol Diesel Price: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धा दरम्यान मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी कच्चे तेल स्वस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत स्वस्ताई येण्याची शक्यता आहे. पण ट्रम्प यांच्यावर किती विश्वास ठेवायचा असा सवाल अनेकांना पडला आहे. मंगळवारी होलसेल गॅसोलीनचा भाव 3.22 प्रति गॅलन डॉलर इतका होता. तर होलसेल हिटिंग ऑईल प्राईस 4.67 प्रति गॅलन डॉलर इतका आहे.

पण घातली ती अजब अट

ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, जेव्हा आम्ही इराण सोबतचे युद्ध जिंकू तेव्हा तेलाच्या किंमती झपाट्याने खाली येतील. त्यानंतर इतर वस्तूंच्या किंमतीत घसरण होईल. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार या किंमती 3 डॉलर प्रति गॅलन होतील आणि अखेरीस त्या 2 डॉलर प्रति गॅलनपेक्षा खाली उतरतील. त्यांनी हे स्वप्न कधी पूर्ण होणार याची निश्चित तारीख सांगितली नाही, पण लवकरच या गोष्टी घडतील आणि इराणकडे अणुवस्त्रे नसतील, असा दावा त्यांनी केला.

होर्मुज समुद्रधुनीवर अमेरिकाचा ताबा

ट्रम्प यांनी अजून एक मोठा दावा केला आहे, त्यानुसार, जर कच्चा तेलाच्या किंमती या 2 डॉलरपर्यंत घसरल्या म्हणजे 50 टक्के कमी झाल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येतील. ट्रम्प यांनी होर्मुज समुद्रधुनीवर ताबा मिळवल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. त्यांनी होर्मुजचे नाव ट्रम्प स्ट्रेट करण्याचा प्रस्तावही दिला आहे. आता ट्रम्प यांचा दावा किती खरा ठरतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अमेरिकन लष्कराचा दावा काय?

अमेरिकन सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) दाव्यानुसार, इराणवर बंदी घातल्यापासून 94 व्यावसायिक जहाजांनी त्यांचा रस्ता बदलवला आहे. सोमवारी अमेरिकन लष्कराने ही माहिती दिली. अमेरिकेची बंदी लागू झाल्यापासून या व्यावसायिक जहाजांनी समुद्री मार्ग बदलल्याचे समोर आले आहे. त्यातील दोन जहाजांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. CENTCOM ने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाचे ते पालन करत आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात