AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishakha Raut : ‘एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, मी 20 नगरसेवक फोडून आणते, पण मला..’ विशाखा राऊतांवर गंभीर आरोप

Vishakha Raut : "विशाखा राऊत यांच्यावरती कारवाई सुरू असताना, त्यांनी आपला निधी लवकरात लवकर संपवण्यावरती भर दिला, याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार व याची चौकशी करायची मागणी करणार" असं समाधान सरवणकर म्हणाले.

Vishakha Raut : 'एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, मी 20 नगरसेवक फोडून आणते, पण मला..' विशाखा राऊतांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray-Vishakha Raut
| Updated on: Sep 08, 2026 | 10:07 AM
Share

निखिल चव्हाण, प्रतिनिधी : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा एक राजकीय धक्का आहे. काल मुंबई महापालिकेच्या सभागृहात अधिकृतपणे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. या सगळ्या प्रकरणात बोलतान समाधान सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समाधान सरवणकर हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक वरळीमधून लढवलेली. पण त्यांचा पराभव झाला. अपात्रतेच्या कारवाईतू स्वत:ला वाचवण्यासाठी विशाखा राऊत स्वत: एकनाथ शिंदेंकडे गेल्या होत्या असा दावा समाधान सरवणकर यांनी केला.

“7 ते 10 दिवसांपूर्वी विशाखा राऊत स्वत: एकनाथ शिंदेंकडे गेल्या होत्या. मी 20 नगरसेवक फोडून आणते. पण मला यातून वाचवा” असं त्यांनी शिंदेंना सांगितल्याचा दावा समाधान सरवणकर यांनी केला. “त्यांच्याआधी देखील ज्या वेळेला मीना कांबळी यांनी, जेव्हा आमच्या पक्षात प्रवेश केला त्या वेळेला देखील या शिंदे साहेबांची भेट घ्यायला गेल्या होत्या. त्यांना सिद्धिविनायक मंदिराचं ट्रस्टीच पद हवं होतं, पण शिंदे साहेबांनी त्यावेळेला पूर्ण नकार दिलेला” असं समाधान सरवणकर म्हणाले.

24 ते 25 कोटीची प्रॉपर्टी त्यांची आहे

“विशाखा राऊत यांना आपलं जात प्रमाणपत्र महापालिकेच्या झालेल्या चौकशीमध्ये सिद्ध करता आलं नाही, त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद गेलं. त्यांनी लक्ष दिलं नाही, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्यांच्या लॉयरने देखील त्यांची बाजू मांडली. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट काढलेलं हे दिसून आलं” असं समाधान सरवणकर म्हणाले. “व्यवसायामध्ये आपण बघितलं असेल गेल्या महानगरपालिकेच्या आधी 24 ते 25 कोटीची प्रॉपर्टी त्यांची आहे.कुणबी दाखवण्यासाठी त्यांना ते घरकाम किंवा मी घरेलू कामगार अशा पद्धतीचं ते दाखवणं गरजेचं होतं. पण मुंबईच्या त्या महापौर होत्या. माहीम विधानसभेच्या त्या आमदार होत्या” असं समाधान सरवणकर म्हणाले.

किचन कॅबिनेट मधल्या त्या मेंबर आहेत

“विशाखा राऊत त्यांचे वडील हे बँकेत जॉबला होते, हे संपूर्ण दादरमध्ये माहिती आहे आणि ते त्यांचं जे काही वास्तव्य होतं हे दादरमध्येच होतं. पण अनेक खोट्या गोष्टी त्यांनी त्या जात पडताळणी म्हणजे फक्त कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी दाखवलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते रद्द झालेलं आहे. त्यानंतर देखील मुंबई हायकोर्टात देखील त्या गेलेल्या होत्या” असं समाधान सरवणकर म्हणाले. “मला मिळालेल्या माहितीनुसार विशाखा राऊत यांना मातोश्रीवरती खूप झापलेलं आहे. मातोश्रीला देखील माहित होतं की हे खोटं आहे अनेक वर्षापासून विशाखा राऊतला आम्ही ओळखतो. मातोश्री वरती ओळखतात, किचन कॅबिनेट मधल्या त्या मेंबर आहेत. त्यांच्यामुळे त्या लोकांना देखील माहित होतं की ओबीसी नाहीयत” असं समाधान सरवणकर म्हणाले.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात