AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt: संजूबाबाची रिहॅब सेंटरमधील ‘ती’ 2 वर्ष, बाथरुममध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे प्रचंड घाबरलेला अभिनेता

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. आयुष्याची अनेक वर्ष अभिनेत्याने दारु, ड्रग्सच्या व्यसनात घालवली. ज्यामुळे कुटुंबियांनी त्याला रिहॅब सेंटरमध्ये देखील पाठवलं, पण तेथे देखील अभिनेत्याला भयानक अनुभव आले. याबद्दल खुद्द अभिनेत्याने मोठा खुलासा केलेला...

Sanjay Dutt: संजूबाबाची रिहॅब सेंटरमधील 'ती' 2 वर्ष, बाथरुममध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे प्रचंड घाबरलेला अभिनेता
अभिनेता संजय दत्त
| Updated on: Jul 29, 2026 | 3:46 PM
Share

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याचं आयुष्य कधीचा साधं राहिलेलं नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, ज्यामुळे देशात खळबळ उडाली. म्हणूनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याचा निर्णय घेताला. सिनेमात संजय याच्या आयुष्यात अमली पदार्थ, बंदुका, तुरुंगवास, प्रेमसंबंध आणि पालकांसोबतचे गुंतागुंतीचे नाते अशा अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला… एवढंच नाही तर, एका मुलाखतीत अभिनेत्याने स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठं सत्य सांगितलं. त्यांच्या आयुष्यातील ती दोन वर्ष, जी त्याने रिहॅब सेंटरमध्ये घालवली… तेव्हा संजय याला त्याने केलेल्या चुकांचा अनुभव झाला आणि नव्याने अभिनेत्याने आयुष्याची सुरुवात केली.

संजय दत्त म्हणाला, ‘तो माझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट होता. एका सकाळी मी उठलो आणि आरशात स्वतःला पाहिलं… तेव्हा मला असं वाटलं मी मरत आहे. माझा चेहरा काही वेगळाच झालेला. त्यामुळे मी तेव्हा माझे वडील सुनील दत्त यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझी मदत केली. मी त्या लोकांचे आभार मानेल ज्यांनी मला अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं… त्या रिहॅब सेंटरमध्ये मी दोन वर्ष राहिलो…’

रिहॅब सेंटरमधील दिवस आठवत अभिनेता म्हणाला, ‘त्या दोन वर्षांत मी काउन्सलरसोबत बाहेर जायचो, सरोवराच्या काठावर जायचो आणि बार्बेक्यूचा आनंद घ्यायचो. मी अधिक मोकळेपणाने बोलायला लागलो, माझा स्वभावही अधिक बोलका झाला. मी सिनेमांबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारायचो. तेव्हा मला वाटलं, ‘मी ही इतकी वर्षे का वाया घालवली? त्या सुंदर सरोवराचा आनंद घेण्याऐवजी, बार्बेक्यू करण्याऐवजी, महामार्गावर मॅराथॉन धावण्याऐवजी किंवा सायकल चालवण्याऐवजी… मी काहीतरी वेगळंच करत होतो. तेव्हा मी स्वतःलाच म्हणालो, मला असं आयुष्य जगायचं आहे… जे आयुष्य मी जगत होतो, ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती…’

मुंबई बॉम्बब्लॉस्ट प्रकरणी काय म्हणाला संजय दत्त?

संजयने त्याच्या आयुष्यातील आणखी एका वादळी पर्वाबद्दल देखील सांगितलं. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत अभिनेत्याला कारावासाची शिक्षा झालेली. ती वेळ आठवत अभिनेता म्हणाला, ‘माझ्या वडिलांना धमकावलं जात होतं, माझ्या बहिणींना धमक्या दिल्या जात होत्या. माझ्याकडे बंदूर आहे, पण ही गोष्ट ते साध्य करु शकले नाहीत… त्यामुळे मला माहिती नव्हतं मला का कैद केलेलं…’

पुझे अभिनेता म्हणाला, ‘मी एवढंच म्हणू शकतो की, ‘टाडा’ कायद्यांतर्गतच्या खटल्यात किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात माझा काहीही सहभाग नव्हता, हे समजायला त्यांना 25 वर्षे लागायला नको होती. हे समजायला त्यांना 25 वर्षे का लागली आणि माझ्याकडे कधीही कोणतीही बंदूक सापडलेली नसतानाही मला ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत दोषी का ठरवण्यात आले, हे मला समजत नाही. असं म्हणत अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केलेला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा