गोविंदा पाठोपाठ संजय दत्त करणार राजकारणात कमबॅक? मोठी माहिती समोर

| Updated on: Apr 09, 2024 | 8:52 AM

Politics | प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचा मोर्चा कळतोय राजकारणाकडे, गोविंदा, कंगना रनौत यांच्यानंतर अभिनेता संजय दत्त देखील करणार राजकारणात कमबॅक... खुद्द संजूबाबाने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं सत्य... सर्वज्ञ फक्त आणि फक्त संजूबाबा याची चर्चा...

गोविंदा पाठोपाठ संजय दत्त करणार राजकारणात कमबॅक?  मोठी माहिती समोर
Follow us on

निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वत्र राजकारणाच्या चर्चा रंगल्या आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे गोविंदा याने शिंदे गटासाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला. गोविंदा हा शिंदे गटाचा स्टार प्रचारक आहे. सांगायचं झालं तर, कंगना, गोविंदा यांच्या पाठोपाठ अभिनेता संजय दत्त देखील राजकारणात कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. संजूबाबा निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर, कोणत्या पक्षासाठी काम करेल, कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवेल? अशा अनेक चर्चांनी जोर धरला आहे. अशात रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द संजूबाबाने एक्सच्या माध्यामातून पूर्णविराम दिला आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

एक्सवर पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘मी राजकारणात येणार अशा रंगणाऱ्या चर्चांवर मी पूर्णविराम लावतो… मी कोणत्याच पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढवणार नाही…’ संजूबाबा पुढे म्हणाला, असं काही करायचं असेल तर मी लपवणार नाही… ‘जर मी राजकारणात उतरण्याचा विचार करत असेल तर, सर्वप्रथम घोषणा करेल… माझ्याबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला आहे.

सांगायचं झालं तर, एका जवळच्या मित्राच्या सांगण्यावरून संजय दत्तने 2009 ची लोकसभा निवडणूक समाजवादी पक्षाचा उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर त्याने स्वतःचं नाव मागे घेतलं. संजयचे वडील सुनील दत्त काँग्रेस पक्षाचे खासदार होते आणि त्यांची दीर्घ राजकीय कारकीर्द होती.

संजय दत्त याचे आगामी सिनेमे

संजय दत्त राजकारण नाहीतर, सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘द व्हर्जिन ट्री’ सिनेमातून अभिनेता चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. सिनेमात संजूबाबासोबत अभिनेत्री मौनी रॉय आणि पलक तिवारी देखील आहे. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून देखील अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि दिशा पाटनी देखील आहे.