करिश्माच्या मुलांची आई होऊ शकत नाही, पण…, अभिनेत्रीच्या सवतीचं मोठं वक्तव्य

Priya Sachdev: घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिचे पूर्व पतीसोबत कसे होते संबंध? करिश्माची सवत म्हणाली, 'करिश्माच्या मुलांची आई होऊ शकत नाही', सध्या सर्वत्र संजय कपूर याच्या कुटुंबियांची चर्चा...

करिश्माच्या मुलांची आई होऊ शकत नाही, पण..., अभिनेत्रीच्या सवतीचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jun 25, 2025 | 12:06 PM

Priya Sachdev on Karisma Kapoor Kids: अभिनेत्री करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उद्योजक आणि पूर्व पती संजय कपूर यांच्या निधनानंतर करिश्मा हिचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. करिश्मा कपूर हिला घटस्फोट दिल्यानंतर संजय याने प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केलं. प्रिया हिने जुन्या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले. शिवाय सवत करिश्मा हिच्या मुलांसोबत असलेल्या नात्यावर देखील प्रिया हिने मोठं वक्तव्य केलं होतं.

घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय यांचं नातं कसं होतं? यावर देखील प्रियाने मोठा खुलासा केलेला, ‘घटस्फोटानंतर संजय कायम करिश्मा आणि दोन मुलांना भेटायला दिल्लीहून मुंबईत जायचा…’, सांगायचं झालं तर, घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

प्रियाने सांगितल्यानुसार, एका विमानात संजय आणि प्रिया यांची पहिली ओळख झाली होती. पहिल्या भेटीनंतर संजय आणि प्रिया यांच्यात चांगली मैत्री झाली. करिश्माला हिला घटस्फोट दिल्यानंतर संजय याने प्रिया हिच्यासोबत तिसरं लग्न केलं.

प्रिया म्हणाली, ‘संजय आणि करिश्मा यांचं लग्न पारंपरिक नव्हत. पण त्यांनी दोन गोंडस मुलांचं जगात स्वागत केलं.’ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रियाचं पहिलं लग्न विक्रम चटवाल याच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव सफीरा असं आहे.

प्रिया म्हणाली, ‘संजय सोबत लग्न झाल्यानंतर अनेक समस्या समोर आल्या. विशेषतः घरातील नियम बदलेले होते. पण वेळेनुसार संजय आणि सफिरा यांच्यामध्ये देखील घट्ट नातं तयार झालं. दोघांचं नातं घट्ट झाल्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो… समायरा (करिश्माची मुलगी) आणि सफीरा यांच्यामधील नातं देखील घट्ट झालं.’

‘आज संपूर्ण कुटुंब एकमेकांवर प्रेम करत आहे. एकमेकांचं कौतुक करत आहे. मी कधीच करिश्माच्या मुलांची आई होऊ शकत नाही. पण त्यांच्यासाठी माझ्या मनात कायम खास स्थान आहे आणि राहील…’ असं देखील प्रिया म्हणाली होती. दरम्यान, पती संजय कपूर याच्या निधनानंतर प्रिया पूर्णपणे कोलमडली आहे.

संजय कपूर याचं निधन

संजय कपूर याचं अचानक निधन झाल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. लंडन येथे पोलो खेळत असताना संजय याने मधमाशी गिळली. ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने संजय याचं निधन झालं. 12 जून रोजी संजय कपूर याने वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.