
Sanjay Kapoor – Tabu: अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘दृश्यम 3’ सिनेमामूळे तब्बू सध्या चर्चेत आहे. पण तब्बू हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. फार कमी लोकांना माहिती की, अभिनेत्रीने तिच्या करियरची सुरुवात अभिनेता संजय कपूर याच्यासोबत केली. सिनेमाच्या शुटिंगदरम्यान, तब्बू आणि संजय यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. ‘प्रेम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, संजय आणि तब्बू यांचं नातं बहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दरम्यान एका मुलाखतीत संजय याने त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं. ‘सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच आमचं नातं देखील संपलं…’
फक्त संजय कपूर यानेच नाही तर, तब्बू हिने देखील रिलेशनशिपबद्दल मोठ वक्तव्य केलं होतं. ‘जेव्हा संजय रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा माहीप कपूर हिला सुद्ध डेट करत होता…’, सांगायचं झालं तर, माहीप आणि संजय यांनी लग्न केलं. तर तब्बू आजही एकटीच आयुष्य जगत आहे.
जुन्या मुलाखतीत संजय कपूर म्हणालेला, ‘सुरुवातीव तब्बू हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो. ‘प्रेम’ सिनेमानंतर सर्वकाही संपलं. आम्ही एकमेकांसोबत बोलणं देखील बंद केलं होतं. सिनेमा प्रदर्शित झालेला तेव्हा मी 31 वर्षांचा होतो..’ असं देखील अभनेता म्हणाला होता.
माहिप कपूर हिने एका मुलाखतीत संजय आणि तिच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. वन नाईट स्टँडनंतर संजय आणि माहिप यांचं लग्न झालं. ‘आमचं लव्हस्टोरी फार साधी होती. मी फक्त एका अनोळख्या व्यक्तीसोबत वन नाईट स्टँड केलं. मला बिलकूल वाटलं नव्हतं की, माझं त्याच्यासोबतच लग्न होईल. मी त्याच्या पार्टीमध्ये आमंत्रण नसताना गेली होती. तेव्हा आमची ओळख झाली. मी पूर्ण नशेत होती. मी त्याच्या पूर्ण कुटुंबियांना देखील भेटली होती. ‘
माहिप पुढे म्हणाली, ‘असं असताना देखील त्यांनी माझा स्वीकार केला आणि म्हणाले, ‘काय शानदार सून आहे…’ त्यांनी माझं मोठ्या मनाने स्वागत केलं. लग्नाचं कोणताच प्रस्ताव नव्हता. त्याने मला फक्त विचारलं की आपल्याला लग्न करायचं आहे, आणि मी पण होकार दिला.’ आता संजय आणि माहिप यांच्या लग्नाला तीस वर्ष झाली आहेत.