
Monalisa Viral Girl: महाकुंभ 2025 मध्ये प्रसिद्धी झोतात आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मोनालिसा आता कायम चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये देखील मोनालिसा दिसते. एका व्हिडीओमुळे गरीब वस्तीत राहणाऱ्या मोनालिसा हिचं आयुष्य बदललं आहे.
सांगायचं झालं तर मोनालिसा हिला झगमगत्या विश्वात आणणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा याने अखेर मौन सोडलं आहे. बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेल्या सनोज याने मोनालिसा हिला सिनेविश्वात का आणलं यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सनोज याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मोनालिसा हिला बदला घेण्यासाठी झगमगत्या विश्वात आणलं… असं सनोज म्हणाला आहे. ‘तुमच्या लक्षात आलं असेल तर, आता बॉलिवूडमध्ये पूर्वीसारखे सिनेमे तयार होत नाहीत… गेल्या 4-5 वर्षांत अनेक लोकं बेरोजगार झाले आहेत. यामागचं कारण म्हणजे बॉलिवूडने स्वतःला संकुचित केलं आहे. नवीन विषय मोठ्या पडद्यावर येतच नाही…’
‘बाहेरचे कलाकार इंडस्ट्रीमध्ये येऊ शकत नाहीत… आजू-बाजूला जे भाईजानची लोकं आहेत, त्यांनाच काम मिळत आहे. यामुळे अनेकांना सिनेमांकडे पाठ फिरवली आहे. मोनालिसाला मोठ्या पडद्यावर आणण्याचा माझा एकच हेतू आहे… मला या लोकांचा बदला घ्ययचा आहे.’
‘मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही सनी लिओनी हिला इंडस्ट्रीमध्ये आणू शकता. अशात मी एका गरीब मुलीच्या बाजूने का नाही उभा राहू शकत..’ पुढे सनोज याला विचारण्यात आलं की, ‘सनीचा तुम्हाला खूप राग आहे का?
यावर सनोज म्हणाला, ‘राग आहे आणि का नसणार… तिच्या मुळे आपल्या समाजातील मुलींवर वाईट परिणाम होत आहे.. याचं उत्तर कोण देईल… अनेक मुली माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि म्हणाल्या आम्हाला सनी लिओनी सारखं व्हायचं आहे… मला प्रचंड राग आला. त्यामुळे मी मोनालिसा सारख्या सामान्य मुलीला सिनेमात काम करण्याच संधी दिली..’
पुढे सनोज म्हणाला, ‘मोनालिसा प्रचंड साधी मुलगी आहे. महाकुंभातून उत्पन्न झालेली मुलगी… जिच्यावर भोलेनाथ यांचा आशीर्वाद आहे. तिला मी झगमगत्या विश्वात आणलं आहे. पण हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान आहे…’ असं देखील सनोज म्हणाला.