मला पुरुषाची गरज..; घरातल्या वातावरणामुळे सारा अली खानचा मोठा निर्णय, लग्नाबद्दल स्पष्टच बोलली..

घरातील वातावरण पाहता सारा अली खान म्हणते, 'मला पुरुषाची गरज...', लग्नाबद्दल देखील अभिनेत्री स्पष्ट बोलली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या वक्तव्याची चर्चा...

मला पुरुषाची गरज..; घरातल्या वातावरणामुळे सारा अली खानचा मोठा निर्णय, लग्नाबद्दल स्पष्टच बोलली..
अभिनेत्री सारा अली खान
| Updated on: May 18, 2026 | 12:56 PM

अभिनेत्री सारा अली खान 30 वर्षांची आहे, पण तरी देखील अभिनेत्री सिंगल आहे… सारा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं, पण अभिनेत्री काधीच कोणत्याच नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं आहे. तर नुकताच झालेल्या एका मुलाखीत सारा हिने रिलेशनशिप, लग्न याबद्दल स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिने दबावाऐवजी संयम निवडण्याबद्दल आणि जोडीदार शोधण्यापेक्षा स्वतःच्या विकासाला प्राधान्य देण्याबद्दल सांगितलं, विशेषतः जेव्हा तिच्या अनेक मित्रांना त्यांचे जीवनसाथी आधीच मिळाले आहेत.

सारा अली खान हिच्या म्हणण्यानुसार, लग्नावर अभिनेत्रीच्या मनात कोणताच भ्रम नाही.. सर्वच लग्न आनंदी असतात असं नाही. सारा अली खान म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या अनुभवातून आणि आजू-बाजूला जे पाहता, त्यानुसार निर्णय घेता. मी पाहिलं आहे, सर्वच लग्न बरोबर असू शकत नाही… काही निर्णय चुकीचे देखील असतात. यापेक्षा योग्य आहे की, तुम्ही प्रतिक्षा करा आणि योग्य व्यक्तीसोबत लग्न करा…’

पुढे सारा म्हणाला, ‘माझं आयुष्य पूर्ण करण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा सर्वकाही चांगलं होईल. आज माझ्याकडे ते सर्व आहे, ज्यामुळे मी माझं आयुष्य लग्न न करता चांगल्या प्रकारे जगू शकते. स्वतःला पूर्ण करण्यासाठी मला कोणाची गरज नाही आणि कोणाच्या शोधात देखील नाही.’

‘सध्या मला माझं पूर्ण लक्ष माझ्या करियरवर केंद्रित करायतं आहे… मला स्वतःला आधी पूर्ण करायचं आहे. यादरम्यान कोणती व्यक्ती आली तर, मी विचार करेल. कारण घाईघाईत केलेलं काम कधीच योग्य ठरत नाही.’ असं देखील सारा अली खान म्हणाली.

सारा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा ‘पति पत्नी और वो दो’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे… सांगायचं झालं तर, सारा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सारा हिने अनेकदा आई – वडिलांच्या नात्यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांनी फार लवकर लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. पण अमृता हिने दुसऱ्या लग्नाचा कधीच विचार केला नाही. सिंगल मदर म्हणून अभिनेत्रीने दोन मुलांचा सांभाळ केला.

Follow Us