Sara Gurpal : आपण हॉटेलमध्ये भेटू…वयस्कर व्यक्तीची विचित्र मागणी, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
Sara Gurpal On Casting Couch : प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

पंजाबी अभिनेत्री सारा गुरपाल तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अलीकडेच 'राईज अँड फॉल २' या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. सारा पंजाबी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करते. अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेल्या सारानं खुलासा केला आहे की, तिच्या सुरुवातीच्या काळात तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
ही घटना तिच्यासोबत अनेक वर्षांपूर्वी घडली होती. तो माणूस तिच्यापेक्षा वयानं खूप मोठा होता. त्यावेळी तिला या गोष्टींची जाणीव नव्हती.
हॉटरफ्लायशी बोलताना सारा गुरपाल म्हणाली, 'एक माणूस होता. आम्ही सीसीडीमध्ये भेटलो. मग तो म्हणाला की, आपण एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे. त्यानं मला तिथं यायला सांगितले. पुढच्या वेळी आपण हॉटेलमध्ये भेटू.'
सारा म्हणाली की, त्यावेळी तिला त्या माणसाचा हेतू समजला नाही. नंतर तिच्या बॉयफ्रेंडनं तिला सांगितलं की, त्या माणसाचा हेतू वेगळा होता. हे सत्य कळल्यावर सारा रडू लागली.
सारा गुरपालनं आणखी एक प्रसंग सांगितला, ती तिच्या मैत्रिणींसोबत एका बारमध्ये होती. तिथे मुलांचा एक गटही होता. सारा म्हणाली, 'मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं की, ती हँडसम मुलं आहेत. नंतर ते आमच्या जवळ आले. मग ते आमच्या खूप जवळ आले. ते आम्हाला स्पर्श करू लागले. त्यांनी आमच्यासाठी ड्रिंक्स आणले.' पण, नंतर त्या मुलांचं विचित्र वागणं बघून सारा आणि तिच्या मैत्रिणींनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला.