
मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शत सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश कौशिक यांचं पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले आहेत. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सतीश कौशिक यांचं निधन नसून हत्या असल्याची चर्चा जोर धरत आहे. ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी पार्टी केली, त्याच फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याच्या निधनाला नवीन वळण मिळालं आहे. आता याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर नक्की कोणाला याचा फायदा होईल? या कटामध्ये आणखी किती लोकं सहभागी आहे? याप्रकरणाचं दुबई कनेक्शन काय आहे? अशा सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत.
ज्या फार्म हाऊसमध्ये होळी पार्टी झाली होती, त्या फार्म हाऊसच्या मालकाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. सतीश कौशिक यांच्यासोबत झालेल्या 15 कोटींच्या व्यवहारात फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांचं देखील नाव समोर येत आहे. या 15 कोटी रुपयांच्या व्यवहारात फार्म हाऊसच्या मालकाशी संबंधित इतर अनेक लोकांनाही याचा लाभ मिळू शकतो. या गोष्टीचा पोलीस तपास करत असताना सान्वी मालू यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
फार्म हाऊसचे मालक विकास यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर पतीसोबत संगनमत असल्याचे आरोप केले आहेत. शिवाय, नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल केल्यानंतर, कापसहेडा पोलीस स्थानकातील पोलिसांचा पतीसोबत सहभाग होता. शिवाया याप्रकरणी पोलिसांनी आरोप मिटवले असल्याचा दावा देखील विकास मालू यांच्या पत्नीने केला.
महिलेने आरोप केले आहेत की, पोलीस आधिकारी देखील त्यांच्या पतीच्या पार्टीमध्ये हजेरी लावतात. ज्यामुळे महिलेचे प्रकरण गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र, महिलेच्या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी सतीश कौशिकच्या चौकशीसाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. आता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूवरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यानंतर दिल्ली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
विकास यांची पत्नी सान्वी यांनी सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी स्वतःच्या पतीला दोषी ठरवलं असून पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. अखेर पोलिसांनी मंगळवारी सान्वी यांची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सान्वी यांना २५ प्रश्न विचारली आहेत. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सान्वी यांनी लिखीत स्वरूपात दिली. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.