AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानप्रमाणेच सैफ अली खानच्या घरासाठी नवी सुरक्षा योजना;घरातही केले मोठे बदल; नवीन घराचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर सर्व बॉलिवूडच हादरल आहे. सैफच्या सुरक्षेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. सलमान खानप्रमाणेच सैफच्याही घरात मोठे बदल करण्यात आले असून नव्या अन् बदललेल्या घराचा व्हिडाओही समोर आला आहे.

सलमानप्रमाणेच सैफ अली खानच्या घरासाठी नवी सुरक्षा योजना;घरातही केले मोठे बदल; नवीन घराचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jan 21, 2025 | 2:41 PM
Share

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर सर्व बॉलिवूडच हादरल आहे. तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र यामुळे सेलिब्रिटी राहत असलेल्या परिसरातील किंवा सोसायटींमधील सुरक्षा योजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. एवढी सुरक्षा असताना एवढा गंभीर हल्ला कसा काय होऊ शकतो याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

मात्र आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून. सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र आता पुन्हा असा गंभीर प्रकार घडू नये यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

सलमाननंतर सैफच्या घरातही सुरक्षेखातर बदल 

सैफ राहत असलेल्या सोसायटीमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. घडलेली घटना आणि सुरक्षा लक्षात घेता सैफच्या सोसायटीच्या बाल्कनीत जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. आता या सोसायटीच्या बाल्कनीत कुणीही आत जाऊ नये यासाठी जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा लक्षात घेऊन या जाळ्या बसवण्यात येत आहेत.

 सैफचं घरही पूर्णपणे सुरक्षित

काही दिवसांपूर्वीचसलमान खानच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता त्याच्याही वांद्रे येथील सलमान खानच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या. एवढच नाही तर फेन्सिंग आणि हायटेक कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे. आता त्याच परिसरात सैफ राहत असलेली सोसायटी देखील आहे.

त्यामुळे आता सलमाननंतर सैफचं घरही पूर्णपणे सुरक्षित करण्यात येत आहे. त्याच्या सर्व घराच्या बाल्कनीला आता मजबूत अशा लोखंडी जाळ्या बसवून घेण्याचं रकाम सुरु आहे.

सुरक्षारक्षक बदलले जाणार

तसेच मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात. ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आला आहे. सैफवर हल्ला करणारा चोर हा एवढ्या 12 व्या मजल्यावर पोहोचून पुन्हा पायऱ्यांनी खाली येतो मात्र तरीही कोणाला समजू नये ही गोष्ट खरोखरच गंभीर असल्यानं सुरक्षारक्षकांवरही तेवढेच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे आता आधीचे सुरक्षारक्षक बदलले जाऊ शकतात असही म्हटलं जात आहेत.

दरम्यान सैफच्या बदललेल्या नव्या घराचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच सोसायटीमध्ये इतरही काही बदलही केले जाऊ शकतात असही म्हटलं जातं आहे. एवढच नाही तर सैफच्या सोसायटी खाली सुरक्षेखातर पोलिसांची उपस्थितीही सध्या दिसत आहे.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.