ईदच्या दिवशी शाहरुख खानची निराशा, लेक सुहानाचा देखील उतरला चेहरा, असं झालं तरी काय?

Shah Rukh Khan - Suhana Khan: ईदच्या दिवशी का झाली शाहरुख खानची निराशा, किंग खानच्या लेकीचा देखील का उतरला होता चेहरा? नक्की असं झालं तरी काय? किंग खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत

ईदच्या दिवशी शाहरुख खानची निराशा, लेक सुहानाचा देखील उतरला चेहरा, असं झालं तरी काय?
| Updated on: Apr 01, 2025 | 3:22 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान मुस्लिम धर्मातील आहे. पण अभिनेता सर्व धर्मांचा सन्मान करतो आणि मुस्लिम धर्मांशिवाय हिंदू सण देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतो. पण नुकताच ईद झाल्यामुळे शाहरुख खान चर्चेत आला आहे. सोमवारी मुस्लिम समाजातील लोकांनी ईदचा सण जल्लोषात साजरा केला. यावेळी अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या.

ईदच्या दिवशी शाहरुख खान प्रत्येक वर्षी ‘मन्नत’ बंगल्यातून चाहत्यांच्या भेटीस येतो. पण यावर्षी मात्र ‘मन्नत’ बंगल्याबाहेर हे दृश्य दिसलं नाही. कारण ‘मन्नत’ बंगल्याच्या नुतनीतरणाचं काम सुरु असल्यामुळे शाहरुख खान कुटुंबासोबत दुसऱ्या बंगल्यात राहायला गेला आहे.

सांगाचयं झालं तर, ईदच्या दिवशी शाहरुखने ना चाहत्यांना शुभेच्छा दिल्या ना तो आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहायला आला. दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात शाहरुखच्या संघाचा मुंबईकडून दारुण पराभव झाला होता.

 

 

ईदच्या दिवशी शाहरुख खानची झाली निराशा

शाहरुख खान प्रत्येक सामन्यात त्याच्या टीम केकेआरला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये असतो. मात्र सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता आणि मुंबई यांच्यात सामना रंगला तेव्हा शाहरुख यावेळी उपस्थित नव्हता. या सामन्यात किंग खानच्या टीमला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे देखील शाहरुख खान निराश होता.

सुहाना खानचा देखील उतरला चेहरा

शाहरुख खान टीम केकेआरला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये नसला तरी, अभिनेत्याची लेक सुहाना खान टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासोबत अभिनेता चंकी पांडे देखील होता. पण टीमच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे सुहाना खानचा देखील चेहरा उतरला होता. सुहाना टीमवर निराश असल्याचं देखील दिसून आलं.