AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साक्षी तन्वरचे ‘या’ अभिनेत्यासोबत ‘प्रेमसंबंध’, तरीही लग्नाआधी झाली आई, वयाच्या 50 व्या अभिनेत्री का अविवाहित?

लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेणाऱ्या साक्षी तन्वरने का नाही केलं लग्न? प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते प्रेमसंबंध, लग्नाबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, साक्षी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत.

साक्षी तन्वरचे 'या' अभिनेत्यासोबत 'प्रेमसंबंध', तरीही लग्नाआधी झाली आई,  वयाच्या 50 व्या अभिनेत्री का अविवाहित?
फाईल फोटो
| Updated on: Apr 01, 2025 | 1:50 PM
Share

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या पन्नाशीत देखील अभिनेत्री त्यांच्या मुलांसोबत एकट्याच जगत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी तन्वर… साक्षी तन्वर हिला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत साक्षीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.साक्षी वयाच्या 50 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.

साक्षीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी एक सेल्स ट्रेनी म्हणून काम करत होती. त्यानंतर साक्षीने ‘दूरदर्शन’ वरील ‘अलवेला सुर मेला’ साठी ऑडिशन दिलं. त्यामध्ये प्रेजेंटर म्हणून साक्षीची निवड झाली. त्यानंतर साक्षी ‘दस्तूर’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर ‘कहानी घर घर की’ मालिकेतून साक्षीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत वाढ झाली.

पण एक काळ असा देखील आला जेव्हा साक्षी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. रिपोर्टनुसार, साक्षीने अभिनेता समीर कोचर याला डेट केलं आहे. पण दोघांपैकी एकाने देखील नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.

अनेक सेलिब्रिटींसोबत साक्षीच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्री आई होण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 45 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं. आज साक्षी दत्तक घेतलेल्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

दरम्यान, एका मुलाखतीत साक्षीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला लग्न करायला काहीही हरकत नाही. पण मला असा मुलगा कधी भेटलाच नाही. ज्याच्यासोबत मी लग्न करु शकेल आणि पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत जगू शकेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

साक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने फक्त मालिकांमध्येच नाही तर, सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साक्षी ‘दंगल’ सिनेमातील  साक्षीच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. साक्षीच्या मुलीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला अनेकदा मुलीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा