Pahalgam Attack:’अमानवी कृत्याबद्दल राग वाटतोय, सगळ्यांनी एकत्र…’पहलगाम घटनेवर शाहरुख खानचा संताप

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खानने संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्याने पीडित कुटुंबांसाठी भावना व्यक्त केल्या असून या हल्ल्याबाबत राग व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपला राग आणि शोक व्यक्त केला आहे.

Pahalgam Attack:अमानवी कृत्याबद्दल राग वाटतोय, सगळ्यांनी एकत्र...पहलगाम घटनेवर शाहरुख खानचा संताप
Shah Rukh Khan Condemns Pahalgam Terror Attack
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Apr 23, 2025 | 6:38 PM

पहलगाममधील दहशतवादी घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत त्यांचा बळी घेतला. यापैकी आतापर्यंत 26 ते 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुःखद आणि हृदयद्रावक घटनेने सर्वांचे हृदय हेलावलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वच स्तरातून टीका होतेय, संताप व्यक्त केला जात आहे. सामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. आता अभिनेता शाहरुख खाननेही या दहशतवादी घटनेवर संताप व्यक्त केला आहे आणि पीडित कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शाहरूख खानची संतप्त प्रतिक्रिया

शाहरुख खानने सोशल मीडियावर या दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. आपला राग व्यक्त करताना, त्याने त्याच्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, “पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघात आणि अमानवी हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आपण फक्त पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो. आपल्या मनापासून संवेदना व्यक्त करू शकतो. चला एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊया आणि मजबूत बनूया आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवून देऊया.” असं म्हणत त्याने या घटनेबद्दल राग व्यक्त केला आहे.

सलमान खाननेही दिली प्रतिक्रिया 

तसेच अभिनेता सलमान खानने देखील या घटनेचा निषेध केला आहे. त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “काश्मीर हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे आणि आता ते नरकात रूपांतरित केले जात आहे.” या हल्ल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. राग, संताप, दु:ख अशा सर्व भावना एकत्र बाहेर पडत आहेत.

शाहरूख खानच्या कामाबद्दल 

2024 मध्ये शाहरुख खानने एकामागून एक तीन मोठे चित्रपट दिले होते. प्रथम त्याचे ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. आणि या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला ‘डंकी’ सुपरहिट ठरला. आता लवकरच शाहरूख खान  ‘किंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत असेल. तर अभिषेक बच्चन खलनायकाची भूमिका साकारणार आहे.