AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam attack: ‘या वादळाने…,खूप काळ लक्षात राहील…’ पहलगाम घटनेवर प्रियांका चोप्रा हळहळली, पोस्टमधून राग, संताप अन् दु:ख

पहलगाम घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बिकट झाली आहे आणि सर्वत्र शोकाचे वातावरण आहे. 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यामध्ये 26 ते 27 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेवर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Pahalgam attack: 'या वादळाने...,खूप काळ लक्षात राहील...' पहलगाम घटनेवर प्रियांका चोप्रा हळहळली, पोस्टमधून राग, संताप अन् दु:ख
priyanka Pahalgam attackImage Credit source: tv9 hindi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Apr 23, 2025 | 6:17 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. एकीकडे लोकांच्या मनात या घटनेत जीव गमावलेल्या पर्यटकांबद्दल दुःख आहे तर दुसरीकडे या दहशतवादाबद्दल राग. या हल्ल्यात 26 ते 27 जणांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

प्रियांका चोप्राची घटनेवर प्रतिक्रिया

या घटनेबद्दल सर्वच स्तरातून राग, संताप,हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. या मुद्द्यावरच आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चोप्राची भावनिक पोस्ट

प्रियांका चोप्राने एक्सवर (ट्विटरवर) एक पोस्ट केली आहे, ती म्हणाली की, “काश्मीरमध्ये जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. काश्मीरच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घेण्यासाठी लोकं सुट्टीत काश्मीरला गेले होते. काही लोक हनिमूनला गेले होते तर काही त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. या वादळात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले ज्यांची काही चूकही नव्हती. त्यांच्या प्रियजनांसमोर त्यांची हत्या करण्यात आली. ही अशी शोकांतिका नाही जी लवकर दूर करता येईल. ही एक अशी शोकांतिका आहे जी दीर्घकाळ लक्षात राहील. या भयानक घटनेने मानवतेला हादरवून सोडले आहे. विस्थापित झालेल्या, शोक करणाऱ्या आणि भीतीत जगणाऱ्या हजारो लोकांसाठी माझी प्रार्थना. मला याबद्दल खूप वाईट वाटतं आहे.” असं म्हणत प्रियांकाने हळहळ व्यक्त केली आहे.

अनेक सेलिब्रिटींनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

पहलगाममधील अपघातानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. या अपघाताचा सर्वजण निषेध करत आहेत. या घटनेनंतर सामान्यांप्रमाणेच अनुपम खेर, अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान अशा अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी