‘किंग’ चित्रपट रिलीज होण्याआधीच गाणे लीक? शाहरुख खान अन् दीपिकाचा किसींग सीन व्हायरल?

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या आगामी 'किंग' चित्रपटातील गाणे लीक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये शाहरूख आणि दीपिकाच्या किसींग सीनही दिसत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

किंग चित्रपट रिलीज होण्याआधीच गाणे लीक? शाहरुख खान अन् दीपिकाचा किसींग सीन व्हायरल?
Shah Rukh Khan King Movie Song Leak, AI Generated Viral Video Debunked
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 19, 2025 | 12:35 PM

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे ती म्हणजे ‘किंग’ या चित्रपटात. ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, पठाण आणि हॅपी न्यू इयर सारख्या चित्रपटांनंतर, या जोडीने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. तसेच ही जोडी हा चित्रपट 2026 ‘किंग’ चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ म्हणजे किंग चित्रपटातील लीक झालेले गाणे असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण एका रोमँटिक गाणे करताना दिसत आहेत. बॅकग्राउंडमध्ये एक रोमँटिक गाणे वाजते आणि व्हिडीओमध्ये दोघांमधील किसिंग सीनही दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंध निर्माण झाला आहे की हा लिक झालेला व्हिडीओ नक्कीक ‘किंग’ चित्रपटातीलच आहे का?

रिलीज होण्यापूर्वीच किंगचे गाणे लीक?

व्हायरल क्लिपमध्ये शाहरुख खान राखाडी केस आणि दाढी असलेला दिसत आहे. दीपिका पदुकोण शिफॉन साडी आणि लाल ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओचा टोन पूर्णपणे फिल्मी आणि रोमँटिक आहे. अनेकांना असे वाटत आहे की हे किंग चित्रपटातील लीक झालेले गाणे आहे. मात्र हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे ‘किंग’ चित्रपटाचा भाग नाही. हा एक एआय-जनरेटेड फॅन एडिट व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटासारखा सॉल्ट एंड पेपर लुक वापरला गेला आहे. व्हिडिओ रिअल दिसावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून दोघांचे चेहरे आणि हालचाली एकत्र करण्यात आल्या आहेत.


व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य

एआयद्वारे ग्रोकसह (AI Grok) अनेक टूल्सने या व्हायरल व्हिडीओची तपासनी केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडीओ बनावट असून चाहत्यांनी बनवलेला आहे. चित्रपटातील कोणतेही गाणे किंवा सीन लीक झालेले नाहीत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या. अनेक चाहत्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ एआयने तयार केला आहे. काहींना तो मजेदार वाटला, तर काहींनी अशा बनावट व्हिडिओंवर नाराजी व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या या युगात, खऱ्या आणि खोट्यामध्ये फरक करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.