Shah Rukh Khan | शाहरुख खान याने केले मोठे भाष्य, झिरो चित्रपटाबद्दल व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाला

शाहरुख खान याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठे धमाके करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसला.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याने केले मोठे भाष्य, झिरो चित्रपटाबद्दल व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाला
| Updated on: Sep 28, 2023 | 4:28 PM

मुंबई : शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसतायंत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला रिलीज होऊन आज 22 दिवस झाले.

आताही शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचा मोठा जलवा हा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने जगभरातून तब्बल 1000 कोटींच्या आसपास कलेक्शन केले. भारतामध्ये चित्रपट लवकरच 600 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट हिट नक्कीच ठरलाय.

जवान चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांसाठी सेशनचे आयोजन करताना दिसला. नुकताच आता शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. यामध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला.

इतकेच नाही तर शाहरुख खान याने थेट एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, मला झिरोची आठवण काढून देऊ नका. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, शाहरुख खान याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते.

एका चाहत्याने ट्विट करत म्हटले की, सर 1000 झिरोमध्ये 10 झिरो असतात. जवान चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननंतर मला याची माहिती मिळाली. तुम्हाला माहीत आहे का? यावर शाहरुख खान याने म्हटले की, मित्रा आता मला या झिरोची आठवण करून देऊन नकोस. हा…हा…

म्हणजेच काय तर पठाण आणि जवान चित्रपटाच्या यशानंतर आता झिरो चित्रपटाबद्दल अजिबात शाहरुख खान याला आठवण करायची नाही. शाहरुख खान याचा आता पठाण आणि जवान चित्रपटानंतर डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचे प्रमोशन करताना आता शाहरुख खान हा दिसतोय.