विराट कोहली-जडेजाच्या ‘पठाण’ डान्सवर शाहरुख खानची प्रतिक्रिया; म्हणाला..

या सेशनदरम्यान चाहत्यांनीही किंग खानला विविध प्रश्न विचारली. एका युजरने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या 'पठाण' गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर संबंधित युजरने शाहरुखची प्रतिक्रिया विचारली.

विराट कोहली-जडेजाच्या पठाण डान्सवर शाहरुख खानची प्रतिक्रिया; म्हणाला..
'पठाण'च्या गाण्यावरील विराट कोहलीचा डान्स, शाहरुखने दिली प्रतिक्रिया
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 14, 2023 | 4:00 PM

मुंबई: शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या 19 दिवसांत जगभरात 946 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा यश साजरा करण्यासाठी शाहरुखने ट्विटरच्या ‘#AskSRK’ सेशनअंतर्गत चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तरं दिली. या सेशनदरम्यान चाहत्यांनीही किंग खानला विविध प्रश्न विचारली. एका युजरने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या ‘पठाण’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर संबंधित युजरने शाहरुखची प्रतिक्रिया विचारली.

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, ‘ते माझ्यापेक्षाही चांगला डान्स करत आहेत. मलाच विराट आणि जडेजाकडून शिकावं लागेल.’ विराट आणि जडेजाचा हा डान्स व्हिडीओ भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचदरम्यानचा आहे. मॅचच्या ब्रेकदरम्यान विराट आणि जडेजाने हा डान्स केला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.

विराट-जडेजाचा डान्स

आणखी एका चाहत्याने शाहरुखला व्हॅलेंटाइन गिफ्टबद्दलही प्रश्न विचारला. ‘तू व्हॅलेंटाइन डे निमित्त गौरी मॅडमला पहिलं गिफ्ट काय दिलं होतंस’, असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, ‘माझ्या आठवणीनुसार आता तर त्या गोष्टीला जवळपास 34 वर्षे झाली आहेत. कदाचित गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे इअररिंग्स (कानातले) दिले होते.’

‘पठाण’च्या सेटवरील एक व्हिडीओसुद्धा नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर शाहरुखचा मुलगा अबराम पहायला मिळतोय. यावरूनही एका ट्विटर युजरने शाहरुखला प्रश्न विचारला.

‘सर सेटवर अबराम काय करतोय? तो पठाणचा सहाय्यक दिग्दर्शक आहे का’, असं मजेशीर सवाल संबंधित युजरने केला. त्यावर किंग खाननेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं. ‘हाहाहाह.. नाही तो स्टायलिस्ट आहे’, असं त्याने लिहिलं.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या सोमवारी 4.6 कोटी रुपये कमावले. त्यामुळे भारतात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा आता 480 कोटींच्या घरात पोहोचला आहे. तिसऱ्या आठवड्यातही पठाणला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉनशिवाय डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.