Video : शाहरुख खानच्या लेकाचा ‘मिस्ट्री गर्ल’सोबत प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, आर्यनच्या अफेअरची सर्वत्र चर्चा

Shah Rukh Khan son Aryan Khan: अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आता देखील आर्यन याला एका मिस्ट्री गर्लसोबत लंडन येथे स्पॉट करण्यात आलं आहे, ज्यामुळे आर्यन याच्यासोबत असणारी मुलगी नेमकी कोण आहे, याची चर्चा सर्वत्र तुफान रंगली आहे...

Video : शाहरुख खानच्या लेकाचा मिस्ट्री गर्लसोबत प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, आर्यनच्या अफेअरची सर्वत्र चर्चा
Aryan Khan
| Updated on: Jul 31, 2026 | 9:00 AM

Shah Rukh Khan son Aryan Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच आर्यन याला लंडन येथे एका मिस्ट्री गर्लसोबत फिरताना स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असा दावा करण्यात येत आहे की, आर्यन याच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. दोघांनी लंडन येथील एका कसीनोच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं आहे.

सुरुवातीला, ही ‘मिस्ट्री गर्ल’ नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु इंटरनेट नेटकऱ्यांनी व्हिडीओ व्हायरल होताच, असा दावा केला की ती दुसरी कोणी नसून आर्टिस्ट विनी ताकेर आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये आर्यन खान अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून, त्याने काळा टी-शर्ट, ट्राउझर्स आणि स्नीकर्स घातले आहेत. त्याच वेळी, त्याच्या शेजारी उभी असलेली विनी देखील पूर्णपणे काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर येताच, सोशल मीडियावर त्यांच्यात काहीतरी शिजतंय का, याबद्दल चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

 

 

विनी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो…

अफेअरच्या चर्चांना उधाण तेव्हा आलं जेव्हा विनी हिने इन्स्टाग्रामवर लंडन ट्रिपचे काही फोटो पोस्ट केले. एवढंच नाही तर फोटो पोस्ट तिने कॅप्शनमध्ये ‘लंडन आय लव्ह यू…’ असं लिहिलं आहे. अशात विनी हिची सोशल मीडिया पोस्ट आणि अर्यन सोबत स्पॉट झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. एवढंच नाही तर, नेटकऱ्यांनी असा देखील दावा केलाय की, सोशल मीडियावर दोघे एकमेकांना फॉलो देखील करतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यन – विनी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

ब्राझिलियन अभिनेत्रीशीही जोडले गेलंय आर्यनचं नाव…

आर्यन खान कायम स्वतःची पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवतो… पण याआधी त्याच्या नावाची चर्चा एका ब्राझिलियन अभिनेत्रीसोबत देखील रंगलेवी. ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोनेसी हिच्यासोबत आर्यनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झालेले. एवढंच नाही तर, ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजच्या प्रिमियर दरम्यान देखील लारिसा हिला स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलेलं. सध्या सर्वत्र आर्यन याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us