‘रस्त्यावर लोकांना मारणं…’, जिहादचा खरा अर्थ सांगत शाहरुख खान म्हणाला…, व्हिडीओ तुफान व्हायरल

Shah Rukh Khan on Jihad: पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा व्हिडीओ तुफान व्हायरल, जिहादचा खरा अर्थ सांगत अभिनेता म्हणाला, 'रस्त्यावर लोकांना मारणं...', सध्या शाहरुख खानच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

रस्त्यावर लोकांना मारणं..., जिहादचा खरा अर्थ सांगत शाहरुख खान म्हणाला..., व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Apr 27, 2025 | 11:58 AM

Shah Rukh Khan on Jihad: जम्मू काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. फिरायला गेलेल्या भारतीयांनी स्वतःचे प्राण गमावल्यामुळे देशात सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. देशात संतापाची लाट उसळली असताना अभिनेता शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहलगाम युद्धानंतर शाहरुख खानचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान जिहाद या शब्दाचा खरा अर्थ सांगताना दिसत आहे.

शाहरुख खान याचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो लोकांना इस्लामबद्दल सांगताना दिसत आबे. शिवाय अभिनेत्याने अशा शब्दाचा उल्लेख केला, ज्याचा खरा अर्थ लोकांना माहितीच नाही आणि तो शब्द आहे ‘जिहाद…’ व्हिडीओमध्ये किंग खान जिहाद शब्दाचा खरा अर्थ सांगताना दिसत आहे.

 

 

शाहरुख खान म्हणाला, ‘मी इस्लामिक धर्माचा आहे. मी मुस्लीम आहे… आमच्या येथे एक शब्दाचा वाईट अर्थ काढला जातो. जिहाद म्हणजे, आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यांचा नाश करणे… बाहेर लोकांना रस्त्यावर मारणं म्हणजे जिहाद नाही…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी शाहरुख खानच्या वक्तव्याचं कौतुक देखील केलं आहे.

कुरानबद्दल शाहरुख खान याने केलेलं वक्तव्य…

शाहरुख खानने गौरीशी लग्न केलं आणि त्यामुळे त्याच्या घरात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांशी संबंधित सण साजरे केले जातात. एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने सांगितलं होतं, त्याच्या घरात गणेश-लक्ष्मीच्या मूर्तीजवळ कुराण देखील ठेवलेलं आहे. घरात मुलं गायत्री मंत्राचा जप करतात तर दुसरीकडे त्यांना कुराममधील गोष्टी देखील माहिती आहेत.

शाहरुख खानच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या चाहते देखील शाहरुख खानच्या आगामी सिनेमाच्या चर्चेत आहेत.