‘शाहरुख खान फक्त लोकांचा वापर करतो, आणि…’, प्रसिद्ध गायकाचं खळबळजनक वक्तव्य

Shah Rukh Khan : शाहरुख खान याच्या यशाचं काय आहे रहस्य? बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाने किंग खान याच्याबद्दल सांगितलं मोठं सत्य... जाणून तुमचाही बसणार नाही विश्वास... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान याची चर्चा...

'शाहरुख खान फक्त लोकांचा वापर करतो, आणि...', प्रसिद्ध गायकाचं खळबळजनक वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 9:05 AM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : चाहत्यांमध्ये कायम बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याची चर्चा रंगलेली असते. अनेक सेलिब्रिटी शाहरुख खान याच्याबद्दल बोलताना दिसतात. काही सेलिब्रिटी किंग खानबद्दल चांगल्या गोष्टी सांगतात, तर कोणी शाहरुख खऱ्या आयुष्यात कसा यावर वक्तव्य करतात. आता देखील बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध गायकाने शाहरुख खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘शाहरुख अनेकांना कामासाठी वापर करतो…’ असं गायक म्हणाला.. शाहरुख खान याच्याबद्दल असं वक्तव्य करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून गायक अभिजीत भट्टाचार्य आहे. सध्या सर्व अभिजीत याने केलेव्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

शाहरुख खान याच्याबद्दल अभिजीत भट्टाचार्य म्हणाला, ‘शाहरुख खान आणि माझं व्यक्तीमत्व एकमेकांपेक्षा फार वेगळं आहे. शाहरुख याने स्वतःला घडवलं आहे. तो एक सेल्फ-मेड अभिनेता आहे. शाहरुख याच्यामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास दोन्ही आहे. माध्यामध्ये स्वाभिमान आहे. पण याला आपण इगो नाही म्हणू शकत.’

पुढे गायक म्हणाला, ‘शाहरुख खान एक कमर्शियल व्यक्ती आहे. जो दुसऱ्यांचा फक्त कामासाठी वापर करतो आणि स्वतःच्या यशामध्ये कोणाला येऊ देत नाही. असं असताना देखील शाहरुख याला राष्ट्रविरोधी म्हणू शकत नाही. अनेकांनी अभिनेत्याला राष्ट्रविरोधी म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. पण शाहरुख खान याच्यापेक्षा मोठा राष्ट्रवादी कोणीही नाही.’

‘शाहरुख खान याचे सिनेमे पाहा ‘स्वदेस’, ‘फिर भी दिल हैं हिंदुस्तानी’, ‘अशोका’, यांसरख्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावली आहे.’ सांगायचं झालं तर, अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरुख खान यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

‘बडी मुश्किल’, ‘मैं कोई ऐसा गीत गाऊ’, ‘तुम्हें जो मैंने देखा’ यांसारखी अनेक गाणी अभिजीत भट्टाचार्य याने शाहरुख खान याच्यासाठी गायली. पण ‘बिल्लू’ सिनेमानंतर दोघे कधीच एकत्र आले नाहीत. दरम्यान, 2016 मध्ये अभिजीत याने सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता.

पाकिस्ताना कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या संधीवर अभिजीत भट्टाचार्य संताप व्यक्त केला होता. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भट्टाचार्य म्हणाला होता, काही चित्रपट निर्माते देशद्रोही आहेत, जे पाकिस्तानी कलाकारांना काम देत आहेत. तेव्हा देखील अभिजीत भट्टाचार्य वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.