Shah Rukh Khan : बुरखा घाल आणि नमाज पठण कर…, गौरीवर दबाव? महुण्याने अभिनेत्यावर साधलेला बंदुकीने निशाणा

Shahrukh Khan-Gauri Khan: आता गौरी बुरखा घालेल, नमाज पठण करेल आणि..., लग्नानंतर शाहरुखकडून गौरीवर दबाव? महुण्याने किंग खानवर का साधलेला बंदुकीने निशाणा, दिलेली अशी धमकी.... फार कमी लोकांना माहितीये प्रकरण...

Shah Rukh Khan : बुरखा घाल आणि नमाज पठण कर..., गौरीवर दबाव? महुण्याने अभिनेत्यावर साधलेला बंदुकीने निशाणा
फाईल फोटो
| Updated on: Oct 08, 2025 | 11:40 AM

Shahrukh Khan-Gauri Khan: अभिनेता शाररुख खान आणि पत्नी गौरी खान यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. गौरी अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, किंग खान याची पत्नी म्हणून कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल देखील सर्वांना माहिती आहे. रिलेशनशिप ते लग्न हा प्रवास दोघांसाठी साधा नव्हता… शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाला आता 33 वर्ष झाली आहेत. पण एकमेकांच्या कठीण परिस्थितीत देखील दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आज गौरी हिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्यातील एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊ…

पहिल्या नजरेतच शाहरुख खान, गौरीच्या प्रेमात पडला… त्यानंतर सुरु झाली दोघांचा लव्हस्टोरी. पहिल्या ओळखीनंतर भेटी वाढल्या आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. पण दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे गौरी हिच्या कुटुंबियांना त्याचं नातं मान्य नव्हतं. दोघांच्या नात्याला कुटुंबियांचा स्पष्ट नकार होता. एवढंच नाही तर, गौरीच्या भावाने किंग खानला धमकी देखील दिलेली.

शाहरुख याच्या आयुष्यावर आधारित ‘King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema’ या बायोग्राफीमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. गौरीचा भावा विक्रांत छिब्बर याने किंग खानवर बंदुकीने निशाना साधला आणि ‘माझ्या बहिणीपासून दूर राहा…’ अशी धमकी दिली होती.

शाहरुखला गौरीने बुरखा घालावा असं वाटत होतं का?

हा किस्सा आणि गौरी आणि शाहरुख यांच्या रिसेप्शन दरम्यानचा… याबद्दल खुद्द शाहरुख खान याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेता म्हणालेला, ‘रिसेप्शनच्या दिवशी गौरी खान हिचे कुटुंबिय पंजाबीमध्ये बोलत होते. तेव्हा मी म्हणालो, ‘गौरी बुरखा घाल चल आपण नमाज पठण करू… संपूर्ण कुटुंबाचं लक्ष आमच्याकडे होतं. तेव्हा मी म्हणालेलो, ‘आतापासून गौरी रोज बुरखा घालेल, जेव्हा ती घरातून बाहेर पडेल तेव्हा तिचं नाव आजपासून आयेश खान असं असेल…’ पण नंतर अभिनेत्याने सर्वांना सांगितल हा फक्त एक विनोद आहे…

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने कधीच गौरी खान हिला धर्म बदलण्यास सांगितलं नाही. आजही किंग खानच्या घराच्या घरात पूजा आणि नमाज पठण होतं… एवंढच नाही तर ‘आपला कोणताच धर्म नाही, आपण भारतीय आहोत..’ असं किंग खान त्याच्या मुलांना सांगत असतो.