शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले

शाहरुख खानच्या लंडनमधील आलिशान बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरूखचा हा बंगल्याचे सौंदर्य पाहून मन थक्क होतं. एखाद्या राजा-महाराजाच्या महलाप्रमाणे हा बंगला आहे. पण बंगल्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले
| Updated on: Jan 01, 2025 | 6:28 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल काही वेगळं सांगायला नको. शाहरूख खान म्हणजे लाखो नाही तरी करोडो दिल की धडकन आहे. देशभरातून लोक त्याला पाहण्यासाठी धडपडत असतात. शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी फार मेहनत घेतली आहे.आज त्याचं नाव हे सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जातं.

लंडनमधील शाहरूखचे घर म्हणजे महालच 

जगभरातील अनेक शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. मुंबईतील शाहरूखचे घर ‘मन्नत’ हे शहरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. शाहरूखला पाहण्यासाठी तसेच त्याच्या घराला पाहण्यासाठी अनेक लोकं या ठिकाणी गर्दी करताना दिसत असतात.

किंग खानची दुबई आणि लंडनसारख्या ठिकाणीही प्रॉपर्टी आहे. अलीकडेच त्याच्या लंडनमधील घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


या व्हायरल फोटोंमध्ये शाहरूख खानच्या घराबाहेर 117 क्रमांक लिहिलेला दिसत आहे. लंडनमधील पार्क लेन या प्रतिष्ठित भागात अभिनेत्याचे घर आहे.

त्याचे आलिशान घर एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. हे घर खूप मोठे आणि सुंदर आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी यावर भरभरून कौतुकाच्या कमेंटस् केल्या आहेत मात्र काही चाहत्यानी नाराजी व्यक्त केली आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची नाराजी

शाहरुख खानच्या लंडनमधील बंगल्याचे फोटो इंटरनेटवर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. फोटोंवर एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, “तुमच्यासाठी माझ्या मनापासून प्रार्थना. तू नेहमी माझ्या प्रार्थनेत असतोस. तू त्यासाठी पात्र आहेस. तू खूप मेहनत केली आहेस. तु नेहमी आनंदी राहा.” असे लिहून एका चाहत्याने अभिनेत्याला शुभेच्छा आणि प्रेम दिलं आहे.

मात्र फोटो पाहून चाहते संतापले

शाहरुखच्या काही चाहत्यांनी हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. पण ही नाराजी शाहरूखवर नाही तर ज्याने हे फोटो शेअर केले त्या नेटकऱ्यावर व्यक्त केली आहे. कारण या चाहत्यांनी अशा प्रकारचे फोटो शेअर करणे म्हणजे प्रत्येकवेळी अभिनेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे उल्लंघन मानले आहे.

याबाबत एका चाहत्याने नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, “हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. शाहरुख देखील माणूस आहे. जर कोणी तुमच्या घराचा फोटो काढून तुमच्या घराचा नंबर दाखवला तर तुम्हाला कसं वाटेल?”, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे ‘हे बरोबर नाही.’ असे लिहून चाहत्यांनी फोटो शेअर करणाऱ्या नेटकऱ्यावरच नाराजी व्यक्त केली आहे. पण शाहरूखच्या या घराबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा हा बंगला खरोखरच एखाद्या अलिशान महालासारखा आहे.