AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद कपूरचा लेक झैनचा क्युटनेस पाहून तैमूरचाही पडेल विसर, छोट्या नवाबाला देतोय तगडी टक्कर!

आता तैमूरसमोर आणखी एक तगडा स्पर्धक आला आहे. आपण शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा मुलगा ‘झैन’ याच्याबद्दल बोलत आहोत. दोघेही आपल्या मुलांना लाईमलाइटपासून दूर ठेवतात. मात्र, नुकताच झैनचा एक फोटो समोर आला असून, तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

शाहिद कपूरचा लेक झैनचा क्युटनेस पाहून तैमूरचाही पडेल विसर, छोट्या नवाबाला देतोय तगडी टक्कर!
तैमुर आणि झैन
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 12:08 PM
Share

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur) जन्मापासूनच खूप चर्चेत आहे. चिमुकला तैमूर सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. इतकेच नाही तर, तैमूरची लोकप्रियताही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. फोटोग्राफर देखील त्याचे फोटो काढण्यासाठी खूप उत्साही असतात. यापूर्वी तैमूर या मीडियाकर्मींना हटकत असे, पण आता त्याला देखील याची सवय झाली आहे (Shahid Kapoor  son Zain photo goes viral on social media).

मात्र, आता तैमूरसमोर आणखी एक तगडा स्पर्धक आला आहे. आपण शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा मुलगा ‘झैन’ याच्याबद्दल बोलत आहोत. दोघेही आपल्या मुलांना लाईमलाइटपासून दूर ठेवतात. मात्र, नुकताच झैनचा एक फोटो समोर आला असून, तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

वास्तविक, फॅशन डिझायनर कुणाल रावल यांनी झैनचा फोटो शेअर केला, जो मीराने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोत तुम्हाला दिसेल की, झैनने कुणालने डिझाईन केलेला कुर्ता-पायजामा परिधान केला आहे. झैनचा क्युटनेस पाहून अगदी कुणीही त्याच्या प्रेमात पडेल.

पाहा झैनचा फोटो

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करून चाहते झैन याच्या क्युटनेसचे कौतुक करत आहेत. तर, कोणी त्याची तुलना शाहिद कपूरच्या बालपणीच्या फोटोशी करत आहे.

तसे, शाहिद आणि मीरा आपल्या दोन्ही मुलांचे फोटो खास दिवसाशिवाय सोशल मीडियावर जास्त शेअर करत नाहीत. तथापि, मीरा मुलांच्या नवनव्या उपक्रमांचे फोटो शेअर करत राहते. काही दिवसांपूर्वी मीराने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता, जो तिची मुलगी मीशाने क्लिक केला होते. मीशाला पेंटिंगचीही खूप आवड आहे (Shahid Kapoor  son Zain photo goes viral on social media).

काही दिवसांपूर्वी शाहिदची आई नीलिमा अझिम यांनी मीराचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, ती एक परिपूर्ण सून, पत्नी आणि आई आहे. तिने नेहमीच दोन्ही मुलांची चांगली काळजी घेतली आहे.

मीराने बदलला लूक

मीराचे मागील काही काळात प्रचंड परिवर्तन झाले आहे. पूर्वी ती खूप साधी असायची, पण आता ती तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. याशिवाय अनेक सामाजिक विषयांवरही ती बोलत राहते.

दुसरीकडे, शाहिदच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, तो शेवट ‘कबीर सिंग’ या चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये कियारा अडवाणी त्याच्यासोबत दिसली होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे, त्यात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता पंकज त्रिपाठी याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहेत. गौतम तिन्नोरी दिग्दर्शित हा स्पोर्ट्स ड्रामा फिल्म आहे.

(Shahid Kapoor  son Zain photo goes viral on social media)

हेही वाचा :

Yami Gautam : यामी गौतमच्या हातावर आदित्य धरच्या प्रेमाची मेहेंदी, सोशल मीडियावर फोटो शेअर

Palak Tiwari : पलक तिवारीचं सोशल मीडियावर कमबॅक, हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.