
दमदार अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावणार्या अनुप्रिया गोएंकाचे लाखों चाहते आहेत. अनुप्रियाचा जन्म 29 मे 1987 रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झाला. असं म्हटलं जातं की शाळा शिकतानाच अनुप्रिया तिच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करायची.

2008 मध्ये कानपूरची अनुप्रिया मुंबई अभिनयासाठी आली. चित्रपटांपूर्वी तिनं अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम केलं, त्यामध्ये ती यूपीए सरकारच्या भारत निर्माण मोहिमेचा भागही बनली.

2017 मध्ये टायगर जिंदा है या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात ती परिपूर्णा परिचारिकाची भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटात छोटी भूमिका होती मात्र तरीही तिनं ही भूमिका साकारली.

यानंतर, ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटात शाहिद कपूरची पहिली पत्नी नागमतीची भूमिका साकारताना दिसली. यात तिने दीपिका पदुकोणशी स्पर्धा केली, म्हणूनच समीक्षकांकडून अभिनेत्रीच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं गेलं. याशिवाय अनेक हिंदी आणि तेलगू चित्रपटांसह ती चित्रपट जगतात सक्रिय आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोएंका ‘आश्रम’ या वेब सीरिजनंतर चर्चेत आली. अनुप्रियानं 2015 मध्ये प्रथम ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटसाठी लेस्बियन जाहिरातीची शूटिंग केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी एका बाबांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचे अभिनेत्रीने उघड केले आहे.

या प्रतिभावान अभिनेत्रीला वेबसिरीज आश्रममधून काही प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. डॉक्टरांच्या भूमिकेत वेबसीरीजमध्ये दिसलेल्या अनुप्रियानं मोठ्या स्टार्समध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.