
प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंगर शहनाझ गिल तिच्या क्यूटनेस आणि चुलबुल अंदाजासाठी ओळखली जाते. आता नव्या फोटोशूट्ससह तिनं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. यावेळी तिनं तिच्या रेड हॉट अवतारात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्रान्सफॉर्मेशन झाल्यापासून शहनाज तिच्या किलर स्टाईलनं लोकांना सतत आश्चर्यचकित करते आहे. आता तिनं काळ्या टॉपवर लाल ब्लेझर घालून फोटोशूट केलं आहे.

लाल कपड्यावर तिनं लाल लिपस्टिक लावून आपला लूक आणखी परिपूर्ण बनवला आहे.

शहनाजचा हा लूक पाहून तिचे चाहते नवनवीन कमेंट करत आहेत. कोणी 'मिर्ची' तर कोणी 'रेड वेल्वेट केक' असं म्हणत आहेत.

'बिग बॉस 13' पासून शहनाज गिल लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या शोमधून तिला फक्त लोकप्रियता मिळाली नाही तर तिनं स्वत:वर भरपूर काम केलं आहे.