Shailesh Lodha | अखेर ‘त्या’ वादावर शैलेश लोढा यांनी सोडले माैन, मोठा खुलासा

अनेक वर्षे तारक मेहता मालिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करणारे शैलेश लोढा हे सध्या तूफान चर्चेत आहेत. शैलेश लोढा यांनी मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप करत सर्वांनाच हैराण केले.

Shailesh Lodha | अखेर त्या वादावर शैलेश लोढा यांनी सोडले माैन, मोठा खुलासा
| Updated on: Oct 02, 2023 | 3:57 PM

मुंबई : शैलेश लोढा यांनी एक अत्यंत मोठा काळ हा टिव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शैलेश लोढा हे कायमच चर्चेत असतात. तब्बल पंधरा वर्षे तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून शैलेश लोढा हे चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसले. इतकेच नाही तर एक अभिनेता असण्यासोबतच शैलेश लोढा हे प्रसिद्ध कवी आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला शैलेश लोढा यांनी सोडचिठ्ठी दिलीये. शैलेश लोढा यांनी फक्त तारक मेहता ही मालिकाच सोडली नाही तर त्यांनी मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. शैलेश लोढा आणि असित कुमार मोदी यांचा वाद थेट कोर्टात पोहचला. शैलेश लोढा यांनी थेट म्हटले की, मला माझ्या कामाचे पैसे दिले गेले नाहीत. मी माझ्या कामाचे पैसे मागितले.

इतकेच नाही तर असित कुमार मोदी यांनी आपल्याला नोकर देखील म्हटल्याचा खुलासा देखील शैलेश लोढा यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आलाय. एक वर्षापूर्वी शैलेश लोढा हे कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याच व्हिडीओबद्दल आता शैलेश लोढा हे बोलताना दिसले.

शैलेश लोढा म्हणाले की, 2012 मध्ये मी आणि कपिल शर्मा एका शोसाठी सिंगापूरला गेलो होतो आणि आम्ही एकसोबत काम केले आहे. आपल्या संस्कृतीनुसार पाहुण्यांशी फ्लर्ट करणे योग्य नाही आणि मी आजही यावर ठाम, असल्याचे शैलेश लोढा यांनी म्हटले आहे. मी याप्रकारच्या कॉमेडीशी असहमत आहे, असेही शैलेश लोढा यांनी म्हटले.

पण असेही नाही की, मी शोमध्ये जाणार नाही. मी शोमध्ये गेल्याने हिंदी कविताला एक वेगळी ताकद मिळालीये. मी जेंव्हा ‘मां’ वर कविता ऐकवली तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आली. एक कलाकार म्हणून कपिल शर्मा हा नक्कीच महान आहे आणि चांगला मित्र आहे यात शंका नाही, असेही शैलेश लोढाने म्हटले.