Shama Sikander: “त्यांना सेक्स..”; बॉलिवूड निर्मात्याविषयी शमा सिकंदरचा धक्कादायक खुलासा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 15, 2022 | 6:12 PM

शमा सिकंदरने टीव्ही आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पूर्वी निर्मात्यांचा (Producers) माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नव्हता, पण आता इंडस्ट्री बदलली आहे, असंही ती या मुलाखतीत म्हणाली.

Shama Sikander: त्यांना सेक्स..; बॉलिवूड निर्मात्याविषयी शमा सिकंदरचा धक्कादायक खुलासा
शमा सिकंदरचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: Instagram

बॉलिवूडमधल्या कास्टिंग काऊचबद्दल (casting couch) अनेकदा कलाकारांनी मोकळेपणे वकव्यं केली आहेत. याबाबत अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. नुकतंच अभिनेत्री शमा सिकंदरनेही (Shama Sikander) कास्टिंग काऊचबाबतचा तिचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. इंडस्ट्रीची काळी बाजू तिने सर्वांसमोर आणली आहे. शमा सिकंदरने टीव्ही आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पूर्वी निर्मात्यांचा (Producers) माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नव्हता, पण आता इंडस्ट्री बदलली आहे, असंही ती या मुलाखतीत म्हणाली.

शमा सिकंदर बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. मात्र आता ती पुन्हा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. शमा म्हणते, “आता इंडस्ट्री खूप बदलली आहे आणि हा बदल सकारात्मक आहे. नवीन पिढीचे निर्माते अतिशय प्रोफेशनल आहेत. ते सर्वांशी आदराने वागतात आणि कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी करत नाही. मात्र मी एका अशा निर्मात्याशी भेटले होते, ज्याची वागणूक ठीक नव्हती.”

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा सिकंदरने या मुलाखतीदरम्यान कास्टिंग काऊचबद्दल तिची व्यथा मांडली. “अनेक निर्माते माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे करायचे. मात्र यामागे त्यांचा हेतू चुकीचाच असायचा. मी विचार करायचे की जर आम्ही एकत्र कामच केलं नाही तर एकमेकांचे मित्र कसे होऊ शकतो. मला वाटतं की त्यांना कामाच्या बदल्यात सेक्स हवा आहे. यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या लोकांचा समावेश आहे. हे केवळ बॉलिवूडपुरतंच मर्यादित नाही. इतर क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे,” असं तिने सांगितलं.

“इंडस्ट्रीत असेही काही जण आहेत, ज्यांच्यासोबत तुम्हाला सुरक्षित असल्यासारखं वाटतं. त्यामुळे प्रत्येकावर आरोप करणं चुकीचं आहे. हल्लीचे निर्माते अत्यंत प्रोफेशनल आहेत”, असं शमा म्हणाली.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI