Vijay Sethupati | मुरलीधरनच्या बायोपिकचे पोस्टर प्रदर्शित होताच नेटकरी संतापले!

| Updated on: Oct 14, 2020 | 8:18 PM

क्रिकेटपटू मुरलीधरनने कधीच समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला नाही, अशी भूमिका त्याच्या चाहत्यांनी घेतली आहे.

Vijay Sethupati | मुरलीधरनच्या बायोपिकचे पोस्टर प्रदर्शित होताच नेटकरी संतापले!
Follow us on

मुंबई : श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर तयार होणारा चित्रपट ‘800’चे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. यानंतर नेटकरी चांगलेच वैतागले आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र, आता या चित्रपटावर बंदीची मागणी करत (Shame On Vijay Sethupati), विजय सेथुपतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Shame On Vijay Sethupati trending on internet after Muttiah Muralitharan motion poster release)

श्रीलंकन तामिळ क्रिकेटपटू मुरलीधरनने कधीच समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला नाही, अशी भूमिका त्याच्या चाहत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या मुरलीधरन टीकेचा धनी झाला आहे. तर, विजय सेथुपती या चित्रपटात मुरलीधरन मुख्य भूमिका सकारात असल्याने त्याच्यावरही राग व्यक्त केला जात आहे. ‘#ShameOnVijaySethupati’ सारख्या हॅशटॅगचा वापर करुन नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

आयपीएल सामन्यापूर्वी मोशन पोस्टर प्रदर्शित

‘800’ असे मुरलीधरनच्या बायोपिकचे नाव असून 13 ऑक्टोबर रोजी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबादमधील सामन्यापूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये मुरलीधरनचे आयुष्य अॅनिमेशन रुपात थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोशन पोस्टरवरुन स्पष्ट होत आहे की, श्रीलंकेतील गृह युद्धापासून ते मुरलीधरन क्रिकेटर बनेपर्यंतचा प्रवास आणि त्याच्या गोलंदाजीवर उपस्थित केलेले प्रश्न या सर्वांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. (Shame On Vijay Sethupati trending on internet after Muttiah Muralitharan motion poster release)

चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांनी अभिनेता विजय सेथुपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटवर मुरलीधरन आणि विजय सेथुपती या दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता. मात्र, आज हा ट्रेंड सुरूझाल्याने सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. या बायोपिकची निर्मिती तमिळ भाषेत होणार असून, जगभरातील इतरही अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

मुथय्या मुरलीधरनचे भारताशी खास नाते

श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला ( Muttiah Muralitharan) ‘विकेट्सचा बादशाह’ म्हणून ओळखले जाते. 1992 मध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. तब्बल 19 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात त्याच्या नावाची चर्चा होती. जुलै 2010 मध्ये त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेवटचा सामानादेखील भारताविरुद्ध खेळला होता. शेवटच्या सामन्यात प्रग्यान ओझाची विकेट घेत, त्याने आपल्या 800 विकेट्स पूर्ण केल्या. (Shame On Vijay Sethupati trending on internet after Muttiah Muralitharan motion poster release)

श्रीलंकेचा हा फिरकीपटू भारताचा जावईसुद्धा आहे. मुथय्या मुरलीधरनने 2005 मध्ये चेन्नईच्या माधीमलार राममूर्ती हिच्याशी विवाह केला होता. सध्या मुथय्या मुरलीधरन आयपीलच्या सनरायझर्स हैद्राबाद टीमच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहे.

मुरलीधरनची क्रिकेट कारकीर्द

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी मिळवण्याचा रेकॉर्ड मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीने 133 कसोटी सामन्यांमधील 230 डावांमध्ये तब्बल 800 बळी मिळवले आहेत. यात त्याने 1 हजार 794 निर्धाव षटकं टाकली आहेत. 51 धावा देत 9 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. तब्बल 67 वेळा त्याने 5 पेक्षा अधिक बळी मिळवण्याची किमया केली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 350 सामन्यांमध्ये 534 बळी मिळवले आहेत. 30 धावा देत 7 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी होती. आयपीएलमध्ये त्याने 66 सामन्यांमध्ये 63 बळी मिळवले आहेत.

(Shame On Vijay Sethupati trending on internet after Muttiah Muralitharan motion poster release)