AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग

Ankit Balian: हरियाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बलियान याची हत्या हा एक पूर्वनियोजित कट होता. हल्लेखोर दोन दिवसांपासून याची तयारी करत होते. अंकितच्या शेड्युलविषयी त्यांना सगळी माहिती मिळाली होती.

Ankit Balian: 'मर्डर मार दे सडक के ऊपर..' इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
Ankit BalianImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 27, 2026 | 12:16 PM
Share

उत्तरप्रदेशातील शामलीमध्ये हरयाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बलियानच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात खळबळजनक तथ्ये समोर आली आहेत. प्राथमिक तपासात असं उघड झालं आहे की ही हत्या पूर्वनियोजित होती. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील हल्लेखोर घटनेच्या सुमारे दोन दिवस आधीपासून अंकितचा मागोवा घेत होते. बुधवारी हल्लेखोरांनी अंकितच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती. त्यांनी घरातून जिमपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि संधी मिळताच जिमबाहेर गोळीबार करून त्याला ठार केलं. हल्लेखोरांना अंकितच्या शेड्युलची संपूर्ण माहिती होती. तो घरातून कधी बाहेर पडतो आणि जिममधून कधी परत येतो हे त्यांना माहीत होतं. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाले असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलीस आता जिम आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. संशयास्पद वाहनं आणि तरुणांची ओळख पटवली जात आहे. अंकितच्या ठिकाणाबद्दल आणि शेड्युलबद्दल हल्लेखोरांना माहिती कोणी दिली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. अंकितचे काका चिकू यांनी पोलिसांना सांगितलं की, अंकितसोबत काम करणाऱ्या राणा नावाच्या व्यक्तीने त्याला धमकी दिल्याचं त्यांना माहीत होतं. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा या हत्येमध्ये सहभाग असावा, असा कुटुंबाला संशय आहे.

पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की हल्लेखोरांचं वय अंदाजे 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील संशयित तरुणांविषयीही माहिती गोळा केली जात आहे. हल्लेखोर कुठे राहिले होते, ते कोणाच्या संपर्कात होते आणि त्यांना अंकितचं ठिकाण कोणी पुरवलं, याचाही तपास ते करत आहेत. या तपासात पोलिसांची अनेक पथकं काम करत आहेत.

या हत्येनंतर अंकितची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. हत्येच्या सुमारे दोन तास आधी अंकितच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये ‘खास भाई की भड़क के ऊपर मर्डर मार दे सड़क के ऊपर…’ असे बोल आहेत. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा विनंती त्याने केली होती.

अंकित मूळचा शामली जिल्ह्यातील बंटीखेडा गावचा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो हरियाणातील रोहतक आणि सोनीपत इथं गायन आणि अभिनयाचं शिक्षण घेत होता. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे ओळखला जात होता. 2023 मध्ये शामलीतील एका रोड शोदरम्यानही तो चर्चेत आला होता.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे